पोस्ट्स

फेब्रुवारी ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची गगन भरारी ऑनलाईन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

इमेज
              खेळामुळे मन ताजेतवाने होते , मनावरचा ताण सहजतेने निघून जातो . मेंदू नवनवीन आव्हाने स्विकारण्यास नव्याने तयार होतो . कोव्हीड १९ मुळे आपल्या सर्वांवर प्रचंड   प्रमाणात अतिरिक्त ताण आलेला आहे . ज्यामुळे आपण सर्वांनी खेळणे अत्यावश्यक आहे सध्याचा कोव्हिडचा पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष समोरासमोर खेळाची स्पर्धा घेणे अवघड आहे . मात्र बुद्धीबळ , सुडोकू , सारख्या बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यास काहीच अडचण नाही . तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक   ग्रँडमास्टरला अभिजीत कुंटे यांना मेजर ध्यानचंद   पुरस्कार जाहिर झाला आहे .  जी समस्त बुद्धीबळ प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे . गेल्या ७५ वर्षात कोणत्याही बुद्धिबळपटुला केंद्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता . हा आनंद साजरा करण्यासाठी आणि खेळाचे सध्याचा काळातील महत्व लक्षात घेवून नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून   आँनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते