पोस्ट्स

जुलै ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षेच्या नावाने .....

इमेज
      मुख्य परीक्षा होवून दोन वर्षे झाली तरी, परीक्षेचा अंतीम टप्पा असलेल्या मुलाखतीचा टप्पा होत नाही, यामुळे निराश होत रविवारी पुण्यात भावी अधिकारी होवू शकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315आणि316 मध्ये राज्य प्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी पर्यतचे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची परीक्षा सदर तरुण देवू इच्छित होता.या आत्महत्येने यापुर्वी अनेकदा चर्चिले गेलेले मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.        घटनेत स्पष्ट उल्लेख असून देखील आयोगाची कार्यक्षमता फारशी उत्तम नसणे. वेळोवेळी प्रश्नपत्रीकेत काही चुका असणे. परीक्षा वेळेवर न घेणे,निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे न देणे आदी गोष्टी आयोग आणि शासनाकडून फार पुर्वीपासून होत आहे. सध्याच्या कोरोनाकाळात यात थोडी वाढ झाली इतकेच. यामुळे खेडोगावातील सर्वसामान्य गोरगरीब भरडला जातो..आज जाहिरात निघेल उद्या जाहिरात निघेल या आशेवर  घरातून आलेल्या पैस्यावर कसीबसी गुजराण