पोस्ट्स

डिसेंबर ५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी आंदोलनाचा वेदनादायी इतिहास

इमेज
नुकतीच 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले रोजी पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने महात्मा फुले यांचे साहित्य वाचत असताना, या महात्म्याचे थोरपण नव्याने समजले. महात्मा फुले यांनी फक्त आपल्या समाजातील उतरडीत तळाला असणाऱ्या समाजालाच जागृत केले असे नाही, त्यांनी आपल्या समाजातील पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांचे दुःख देखील सुशिक्षित समाजासमोर मांडले . त्यांनी केवळ प्रश्च मांडले नाहीत, तर त्यावर उपाय देखील सांगितले ज्यावर त्यांचा शेतकऱ्याचा आसूड आणि ब्राम्हणांचे कसब या पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे. मात्र त्यावेळच्या जूलमी ब्रिटीश सत्तेने आणि त्याचीच काँपी म्हणावी , अस्या स्वतंत्र्य भारतातील सरकारने या उपयाकडे सोइस्कर दुर्लक्ष केल्याने काय झाले ? हे आपण आता टिव्हीवर बघतो आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात लागू केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यामुळे सगळा देश पेटला आहे .विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या  आंदोलनाला समर्थन मिळत आहे. कँनडा, युनाटेड किग्डम या देशातील  संसदेच्या  अनेक सदस्यांनी आणि कँनडाच्या पंतप्रधानांनी याबाबत आपली भुमिका सार्वजनिकपणे जाहिर केली आहेच. तसेच अनेक साहि