पोस्ट्स

एप्रिल १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकसंख्येच्या साडे अकरापट

इमेज
न्युर्याकच्या सबवे मध्ये एका 62 वर्षीय इसमाने केलेल्या बेछूट गोळीबाराने सध्या अमेरीकेत शस्त्रात्रांचा प्रश्न.पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका जागतिक अहवालानूसार जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 4 %लोकसंख्या अमेरीका देशात रहाते. मात्र वैयक्तिक शस्त्रात्राचा विचार केला जगाच्या एकुण वैयक्तिक शस्त्राच्या पैकी 46% शस्त्रास्त्रे अमेरीकन नागरीकांनकडे आहेत.हे प्रमाण लोकसंख्येच्या साडेअकरापट आहे. अमेरीकन गृहयुध्दाच्या वेळी अठराव्या शतकात, अमेरीकन केंद्रीय संविधानाच्या दूसऱ्या घटनादुरुस्तीने स्वसंरक्षणार्थ शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मुलभुत अधिकार अमेरीकन नागरीकांना देण्यात आला. ज्यावेळी शस्त्रास्त्रे बाळगणे, हा अमेरीकन नागरीकांचा मुलभुत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला, तेव्हा अमेरीकेत रस्त्यावर दिवसाढवळ्या गुन्हेगार लोकांना लूटत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस बळ कमी पडत होते. देशातील यादवीमुळे देशात प्रचंड अस्थिरता होती.देशाचे विभाजन होते का?असा प्रश्न निर्माण झाला होता.आजमितीस त्यावेळची स्थिती पुर्णतः बदलली आहे. मात्र त्यावेळच्या परीस्थितीमुळे देण्यात येणाऱ्या मुलभुत अधिकराला अजूनही सोडचिठ्ठी देण्यात न आल

राष्ट्रीय स्तरावर नाशिक चमकणार !

इमेज
     नाशिकमध्ये विविध खेळाचे अनेक गुणवान खेळाडू आहेत. जे आपल्या खेळाद्वारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडत असतात.नाशिकमध्ये खेळाडूंची मोठी परंपरा असून देखील, नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होत नसल्याने, नाशिक मधील क्रीडाविश्व काहीसे निराश झालेले दिसते. मात्र आता हे निराश्याचे दिवस संपले कारण....   नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून 27 ते 30 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय स्तरावरच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये अनेक वर्षांनी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.  .     महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त व भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रविण ठिपसे , पदमश्री व महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे , ग्रँडमास्टर दिव्या देशमुख , या मराठमोळ्या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण , अरविंद चिदंबरम , निलोपतल दास , गोपाल नारायण , मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद , फिडे मास्टर आराध्य गर्ग , निरंजन नवलगुडे आदींचा खेळ बघण्याची तसेच त्यांच्याबरोबर   ख