ब....... बुद्धिबळाचा (भाग 4)
भारताची बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील यशस्वी घोडदौड सुरूच आहे . ऑलम्पियाडमधील रॉबिन राउंड ( जिंकला अथवा हरला तरी ठरलेले सामने खेळायला मिळणे ) पध्द्तीच्या अखेरच्या दिवशी भारताने स्लोव्हानिया या देशाबरोबर तीन तीन अशी बरोबरी तर हंगेरी या पूलमधील बलाढ्य संघाला 4 विरुद्ध 2तर मोल्डवोवा विरुद्ध 5 विरुद्ध 1 असा सफाईदार विजय मिळवत आपल्या पूलमध्ये पहिले स्थान मिळवले , आणि मोठ्या दिमाखदारपणे नॉक आउट ( हरलं की बाहेर ) या फेरीत प्रवेश केला . या यशामुळे आपल्या डिव्हिजनमध्ये पहिल्या सोळापैकी दहाव्या क्रमांकापर्यंत धडक मारली . भारत असलेल्या पुलमधून भारतासह हंगेरी ( क्रमांक 15) या देशाने प्रवेश केला आहे .यापुढे 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्रेन आणि जर्मनी या देशातील विजेत्याबरोबर भारताची गाठ पडेल भारताच्या शुक्रवारच्या डावाची सुरवात हंगेरी या देशाबरोबर झालेल्या डावाने झाली यामध्ये भारताने 4 विरुद्ध 2असे यश मिळवले भारताचे कप्तान विश्वनाथन आंनद या...