पोस्ट्स

मार्च ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आगीतून फुफाट्यात श्रीलंका

इमेज
            जेव्हा एखाद्यवर एकामागून एक  अशी अनेक संकटे येण्यास सुरवात होते तेव्हा त्याची अवस्था  आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी झाली आहे असे आपण म्हणतो .सध्या श्रीलंकेची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे श्रीलंकेचे आर्थिक संकट दिवसोंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने  श्रीलंका सध्या  आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव घेत आहे मार्चच्या सुरवातीपासून  श्रीलंकन सरकारने संपूर्ण देशात साडेसात तास हो साडेसात तासाचे लोडशेडिंग सुरु केले आहे सध्या श्रीलंकेत प्रचंड उन्हाळा असल्याने जलविद्युत बंद आहे . नैसर्गिक इंधने खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने नैसर्गिक इंधनाचे कंटनेर श्रीलंकन बंदरात उभे आहेत मात्र पैसे न दिल्याने कंटनेरमधील नैसर्गिक इंधने श्रीलंकेला वापरता येत नाहीये . परिणामी गेल्या २६ वर्षात झाले नाही असे ऊर्जा संकट श्रीलंकेत निर्माण झाले आहे तेथील नागरिक पेट्रोल पंपावर आता तरी पेट्रोल डिझेल मिळेल या आशेवर तासनतास आपली वाहने उभी करून बसले आहेत . तेथील मासेमारी नौकांना डिझेल मिळत नसल्याने श्रीलंकेतील मच्छव्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे जो देश सुद्धा आर्थिक संकटात आहे अश्या पाकिस्तानकडून मदत मागण्याची व