पोस्ट्स

एप्रिल ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्वस्थ अशांत शेजार !

इमेज
          आजमितीस  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या शेजारी अशांतच अशांतता पसरलेली दिसत आहे भारताच्या पश्चिमेकडील पाकिस्तानात असणारी राजकीय अस्थिरता ,दक्षिण पश्चिम दिशेकडील मालदीवमधील विरोधी पक्षाने सुरु असणारे भारतविरोधी आंदोलन त्यास मिळत असणारा पाठिंबा, ,  दक्षिणेकडील श्रीलंकेची आर्थिक विपन्नता , पूर्वेकडील बांगलादेशात होणारे अल्पसंख्याकावरचे हल्ले , दक्षिण पूर्व ठिकाणी असणाऱ्या म्यानमारमध्ये असणाऱ्या लष्करी राजवटीचा चीनकडे असणारा काहीसा कल ,उत्तरेकडील बाजूचा विचार करता नेपाळमधील राजकारणामध्ये काही वेळा उमटणारा भारतविरोधी सूर,  उत्तर पश्चिम दिशेला असणाऱ्या अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट .भारताच्या बरोबर सीमा असणाऱ्या देशांच्या विचार करता भूतानआणि चीन  वगळता अन्य कोणताही देश शांत नाहीये चीन आपला प्रमुख शत्रूं आहे जो विविध प्रकारे आपल्यला त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, भूतानचा स्वतःचा जीव अत्यंत कमी आहे त्यामुळे भारताला त्याची मदत होण्याची शक्यता कमीच आहे थोडक्यता भारताच्या आसपास अशांतताच मोठ्या प्रमाणत आहे .         मालदीवमधील विद्यमान सरकार जरी भारताच्या बाजूने असले तरी