पोस्ट्स

ऑगस्ट ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दर 65 मिनिटात एक ........

इमेज
                राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे नुकतीच सन 2017 ते 2019या तीन वर्षात किती तरुणांनी आत्महत्या केली याची आकडेवारी जाहीर करण्यात आली  ती अत्यंत भयानक आहे या तीन वर्षात  24हजार तरुणांनी आत्महत्या केल्याची नोंद   राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे . ही आकडेवारी देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या  आत्महत्येच्या गुन्ह्यांची आहे . आपल्या भारतात होणाऱ्या सर्व आत्महत्येची नोंद पोलीस ठाण्यात होत असेल असे मला तरी वाटत नाही . अनेकदा घरातून पळून गेल्याने हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात होण्याची मात्र संबंधित त व्यक्तीने आत्महत्या केले असण्याची आणि काही कारणाने ते प्रेत न सापडल्याची किंवा त्या मृत्यूची नोंद अपघाताने अज्ञाताचा मृत्यू म्हणून होण्याची शक्यता सुद्धा आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे आपण राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागाची आकडेवारी योग्य  मानली तरी ही आकडेवारी मोठी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही तीन वर्षात 24हजार म्हणजे वर्षाला 8 हजार . दिवसाला 22 किंवा   दर  65 मिनिटात एक आत्महत्या . आय पी एल ची एक मॅच साडेतीन तासाची असते . सध्याचा करोनाचा