पोस्ट्स

जुलै ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय साठेमारीत हरवलेले बुद्धिबळातील यश

इमेज
        गेल्या महिनाभरातील  भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर फार मोठे यश मिळवले मात्र त्याची यथोचित दखल राजकीय बातम्या देण्यात मग्न असलेल्या माध्यमांनी घेतली नाही . मराठीतील एक उकृष्ट चित्रपट झेंडा या चित्रपटात  ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सुरवातीला कार्यालयाच्या प्रसंगात आर्थिक बातम्यांना राजकीय बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते याबाबत खंत व्यक्त करण्यात आली होती तोच काहीसा प्रकार या बुद्धिबळपटूनबाबत घडला मात्र "देर आये मगर दुरुस्त आये " , या म्हणीनुसार उशिरा का होईना त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन   बुद्धिबळ स्पर्धा या तीन प्रकारात खेळवण्यात येतात .पारंपरिक प्रकार म्हणजे क्लासिकल ,या प्रकारच्या खेळ हा तीन तास किंवा अधिक चालू शकतो जरी हा खेळ खूप वेळ सुरु असला किती वेळात किती चाली झाल्याचं पाहिजे याचे बंधन आहे जर हे बंधन पाळले न गेल्यास पटावरील स्थिती कितीही विजयासारखी असो खेळाडू डाव हरतो  हा प्रकार काहीसा संथ असल्याने खेळात रंगत आणण्यासाठी या पेक्षा जलद प्रकार खेवण्यात येतो या प्रकारात खेळ संपवण्यासाठी खेळाडूंवर २० ते २५ मिनिटाचे बंधन घालण्यात येते त्यास रॅपिड