पोस्ट्स

एसटीचा प्रवास कुणीकडे?

इमेज
गेल्या सप्टेंबर महिन्यात 22 तारखेला एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यासाठी व्होल्वो बस खरेदी करणार असल्याचे  जाहीर करण्यात आले होते. ही खरेदी प्रक्रिया सुरू झालेली असून याबाबत कंपनी निवडण्यात आलेली आहे हे प्रवाशांनाना 14 ऑक्टोबर रोजी व्होल्वो या कंपनीने स्वतःहून जाहीर केलेल्या प्रसिद्धकाद्वारे  समजले आणि एकच खळबळ उडाली. व्होल्वो बस कंपनीद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपली एसटी महामंडळ व्होल्वो बस कंपनीकडून अत्याधुनिक 9600 मॉडेलच्या एकूण 200 खरेदी करणार आहे. त्यापैकी 170 या सीटर प्रकारातील बसेस असून 30बसेस या स्लीपर अधिक सीटर असणार आहेत. खाजगी आणि सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार करता, एकदम 200 बसेसचे कॉन्ट्रॅक्ट आत्तापर्यंत व्होल्वो कंपनीला आपल्या भारतात कोणीही दिलेले नाही. त्या अर्थाने हा आपल्या  महामंडळाने एक पराक्रमच केलेला आहे असे म्हणता येईल.  मात्र हा पराक्रम कोणत्या स्थितीत केलेला आहे? याला अत्यंत महत्त्व आहे. या प्रत्येक बसची अंदाजित रक्कम इंटरनेटवर शोधली असता,  एक कोटी ती...

स्वामी विवेकानंद यांच्या मानस कन्येचा जीवन प्रवास उलगडवणारे पुस्तक कर्मयोगीनी भगिनी निवेदीता

इमेज
जन्माने आयरिस धर्माने सुरुवातीला ख्रिस्ती मात्र स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात आल्याने आपल्या इतकीच भारतीय झालेली स्वामी विवेकानंद यांची मानस कन्या म्हणून आपण भगिनी निवेदिता यांना ओळखतो. मात्र भगिनी निवेदिता यांची इतकीच ओळख नाही, भगिनी निवेदिता यांना आपण वेदकाळातील गार्गी मैत्रीयी यांची परंपरा पुढे अवाह्यात पुढे नेणारी विदूषी जिने आपल्या लेखनाद्वारे, आणि व्याख्यानाद्धारे भारताच्या प्राचीन वारस्याची जगाला ओळख करून दिली, म्हणूनही ओळखू शकतो. भगिनी निवेदीता यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध गुणांची ओळख होते ती कर्मयोगीनी भगिनी निवेदिता या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित 80 पानी छोटेखानी पुस्तकातून. विवेकानंद  केंद्राच्या मालेगाव  शाखेतील धडाडीचे कार्यकर्ते डॉ. सुरेश शास्त्री यांनी भगिनी निवेदिता यांच्या स्मृतीस शताब्दी वर्षाचे औचित्य साधत लिहिलेल्या या पुस्तकाचे आपण दोन भागात सहजतेने विभाजन करू शकतो. पहिल्या भागात निवेदिता यांच्या जन्म, कौटुंबिक स्थिती, त्यांच्या आईची त्यांच्या जन्माच्या वेळची इच्छा, त्यांचे बालपण आणि त्यांचा असणारा धा...

प्रत्येक ध्येयवादी व्यक्तीने वाचायलाच हवे असे पुस्तक "सेवा समर्पण

इमेज
  मनुष्याने ध्येयवादी का असावे, हे सांगणारे एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः, प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः। विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति॥ मराठीमध्ये याचे भाषांतर करायचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे होते. मनुष्याच्या तीन श्रेणी असतात.. कनिष्ठ (नीच) लोक : जे संकटांच्या किंवा अडचणींच्या भीतीने कोणत्याही चांगल्या किंवा ध्येयाच्या कामाची सुरुवातच करत नाहीत. मध्यम लोक : जे कामाची सुरुवात तर करतात, पण वाटेत एखादे संकट किंवा अडचण आली की काम मध्येच सोडून देतात.उत्तम (ध्येयवादी) लोक : जे एकदा ध्येय निश्चित करून काम सुरू करतात, मग वाटेत कितीही संकटे आली आणि कितीही वेळा अपयश आले, तरीही ते आपले ध्येय साध्य केल्याशिवाय थांबत नाहीत आणि काम कधीही सोडून देत नाहीत. याचा भावार्थ विचारात घेतल्यास आपण पुढील गोष्टी लक्षात घेऊ शकतो.  ध्येयाशिवाय माणसाचे जीवन दिशाहीन होते. ध्येयवादी व्यक्तीला कठीण काळातही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.उत्तम आणि ध्येयवादी माणसे संकटांना घाबरत नाहीत. ती प्रत्येक अडचणीला एक आव्हान मानून त्यावर मात क...

लालपरी एसटी महामंडळ विकणे आहे!

इमेज
लालपरी एसटी बस महामंडळ विकणे आहे. अत्यंत बरोबर वाचत आहात. 9 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास महाराष्ट्र राज्य सार्वजनिक परिवहन महामंडळ अर्थात आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमुळे ही बाब उघड झाली आहे. पत्रकाचा विषय एसटी महामंडळाला आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याविषयी आहे. मात्र त्यासाठी जी उपाययोजना  पत्रकात सांगितली आहे ती बघता लालपरी एसटी महामंडळ विकणे आहे असेच म्हणावे लागेल.  अर्थात समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये याचा अधिकृत उल्लेख नसला तरी रीडिंग बिटवीन लाईन्स समजणाऱ्या व्यक्तीला पत्रक वाचल्यावर ही बाब लगेच समजून येते. दोन पानी या पत्रकांमधील पहिल्या पानावरील शेवटचा चौथ्या क्रमांकावरील परिच्छेद आणि दुसऱ्या पानावरील दुसऱ्या क्रमांकावरील परिच्छेद बघता हे सहज लक्षात येते. पहिल्यांदा दुसऱ्या पानावरील दुसरा क्रमांकाचा परिच्छेद बघूया त्यात सांगितले आहे. महामंडळाच्या राज्यभरातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. यातील मोठ्या प्रमाणातील जमीनी मोक्याच्या ठिकाणी ...

सामाजिक उणीवांची समस्यांची कबुली देणारा एसटी बस व्यवस्थापचा निर्णय

इमेज
गेल्या २७ सप्टेंबर रोजी एसटी बस व्यवस्थापकांकडून राज्यचा दुर्गम भागात बससेवा पोहोचावी यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मिडी बससेवा' सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेची घोषणा करताना जे घोषवाक्य वापरले गेले, त्यामुळे सामाजिक उणीवांची समस्यांची कबुली देणारा एसटी बस व्यवस्थापचा निर्णय याच दृष्टिकोनातून त्याकडे बघावे लागेल. ते घोषवाक्य होते 'एसटी (शेड्युल्ड ट्राईब ) तिथे एसटी'.समाजातील एक घटक अजुनही प्रगतीच्या वाटेपासुन दुर असल्याचे सांगत खऱ्या अर्थाने विकसित भारत उदयास येण्यासाठी बराच पल्ला गाठायचा आहे, हे दाखवून देणारा एकिकडे समृद्धी महामार्ग,शक्तीपीठ महामार्ग यासारखे अत्याधुनिक महामार्ग उभारले जात असताना वनवासी बांधव अजूनही संपर्काचा कक्षेत आलेले नाहीत हे दाखवून देणारा. मनोहर जोशी, नारायण राणे, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी विचारात घेता स्वातंत्र्यानंतरचा ८० वर्षांपैकी २५ टक्के कालावधीत भाजपा सत्तेत होती.तरी देखील हे झालेले नाही. त्यामुळे या पक्षीय रंग देणे चूकीचे असे मला प्रामाणिकपणे वाटते. याबससेवेची सुरुवात करताना एसटी बस ...

मंगरूळचे हस्तांतरण आणि मराठवाडा

इमेज
  महाराष्ट्रातहोणारे  एमपीएससी  आंदोलन आणि देशाचा विचार करता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या  सर्व गदारोळत आपल्या भारतीय रेल्वेच्या नकाशात बदल झाला त्याविषयी आपल्या मराठी माध्यमांमध्ये काहीच बोलले गेले नाही.. आता मी जे सांगणार आहे तो कदाचित अनेकांना स्थानिक मुद्दा वाटेल आणि तो स्थानिक मुद्दा असल्यामुळे आपल्या मराठी माध्यमांमध्ये त्याच्याविषयी आलेले नाही असे काहींना वाटेल मात्र तसे नाही  तो स्थानिक मुद्दा असला तरी त्याच्या आपल्या मराठवाड्याचाही सुद्धा संबंध आहे. तर माझ्या वाचक मित्र मैत्रिणींनो भारतीय रेल्वेच्या प्रशासनाचा विचार करता दक्षिण रेल्वे विभागात असणाऱ्या मंगरूळ रेल्वे स्टेशन आणि परिसराचा समावेश  आता दक्षिण मध्य रेल्वेत करण्यात आलेला आहे. गेल्या एक ऑक्टोबर पासून याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. केरळ राज्यातील पालक्काड  शहर दक्षिण रेल्वे चे एक डिव्हिजनल  मुख्यालय आहे  या मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशात मंगरूळ रेल्वे स्टेशन होते. मात्र स्थानिकांची सातत्याने मागणी ...

असा झाला खासगी अवकाश संशोधन क्षेत्राचा भारतातील प्रवास

इमेज
  १८ जुलै २०२६ या दिवसाची नोंद भारताच्या विज्ञान क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनी झाली आहे. १८ जुलै २०२६ रोजी स्कायरूट एअरोस्पेस या खासगी स्टार्ट अपने विक्रम-१ या रॉकेटचे यशस्वी कक्षीय प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणामुळे भारतीय भूमीवरून कक्षेत उपग्रह पाठवणारी स्कायरूट एअरोस्पेस ही पहिली खासगी भारतीय कंपनी ठरली. एका पडलेल्या चर्चमधून आपण दिवाळीत उडवतो त्याचेच मोठे स्वरूप वाटावे अशा प्रकारचे रॉकेट उडवत, प्रसंगी सायकलला एखाद्या गरीब माणसाने आपले सामान बांधून सामानाची ने-आण करावी, त्या पद्धतीने अवकाश संशोधनाच्या श्रीगणेशा करणाऱ्या एका देशाने पाश्चात्त्य देशांच्या बरोबरीने येत, त्यांच्या देशात घडल्यावर काहीच महिन्यांच्या आत केलेला तो भीम पराक्रम होता. या भीम पराक्रमाची गोष्ट सुरू होते इस्रोच्या स्थापनेपासून. इस्रो भारताची जगात अभिनंदनास्पद वाटावी अशी ओळख. एका अशा देशाची अवकाश संशोधन संस्था, ज्या देशाला १५० वर्षांच्या गुलामीनंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले आहे, मात्र ते फाळणीच्या जखमा घेऊन. देशात भूकमारी, नसलेले औद्योगिकीकरण तसेच असंख्य भाषिक, प्रादेशिक अस्मिते...