पोस्ट्स

ऑगस्ट ८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्तारपूर गुरुद्वारा,कलम 370 समस्येची अप्रकाशित बाजू

इमेज
सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केलेल्या भारतीय संविधानातील कलम 370आणि कलम 35A ची जोरदार चर्चा सुरु आहे .  या  सर्व  चर्चांमध्ये  मुख्यतः जोर आहे तो काश्मीरमधील भविष्यकालीन विकास आणिरद्द करण्यात आलेल्या कलमाबाबत असणारी पाकिस्तानची भूमिका  . पाकिस्तानच्या विचार करता आपल्या भारतात फक्त व्यापारी संबंध  आणि क्रीडा संबंध लक्षात घेतले जातात. मात्र भारत आणि पाकिस्तान यांचा विचार करता या दोन  बाबींबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यास हवी मात्र ती काहीशी दुर्लक्षली जाते ती म्हणजे या दोन देशामध्ये संयुक्तरित्या सुरु असणारे विकास प्रकल्प .  या विकास प्रकल्पामध्ये कर्तारपूर या पाकिस्तानातील पंजाबमध्ये असणाऱ्या गावामध्ये उभारण्यात येणारा कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आणि भारतीय हद्द या दरम्यान उभारण्यात येणार कर्तारपूर कौरीडॉर हा अत्यंत महत्वाचा आहे          शीख बांधवांचे पहिले गुरु , गुरु नानकदेवजी यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे ज्या गुरुद्वारात गेली तो गुरुद्वारा  म्हणजे कर्तारपूर येथील कर्तारपूर साहीब हा गुरुद्वारा . शीख बांधवांत पवित्र मनाला जातो . भारत पाकिस्तान सीमेपासून  हा