पोस्ट्स

नोव्हेंबर ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ड्रॅगनचे फुत्ताकार कोणाकडे ?

इमेज
      आपल्या मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून एक पोलिसी अधिकारी आणि एक मंत्री यांच्यातील वाद , एसटी कर्मचाऱयांच्या संपविषयी सांगितले जात असताना आपला प्रमुख शत्रू जो   आपल्याबरोबर मोठी सीमा देखील शेअर करतो अश्या चीन बाबततीन घडामोडी घडल्या . एक जागरूक सुजाण नागरिक म्हणून आपणास त्या माहिती  अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडींविषयी          तर मित्रानो , सन १९५९ साली अरुणाचल प्रदेश आणि तिबेट सीमेवरील लांगजू या संरक्षण चौकीवर  चीनने आक्रमण करून ती चौकी आणि लगतचा काही भाग आपल्याकडे अनधिकृतपणे घेतला . ९६२ साली जेव्हा चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशात घुसले होते,  तेव्हा एकतर्फी युद्धबंदीनंतर चिनी सैन्य पुन्हा माघारी  तेव्हा सुद्धा तो भाग आपल्याकडेच ठेवला.  त्या भूभागात चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले आहे,  असा उल्लेख अमेरिकी संरक्षण खात्यातर्फे अर्थात पंटेगॉनतर्फे चीनसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे या अहवालाच्या पान  क्रमांक १७६ वर हा उल्लेख करण्यात आला आहे .चीनने या भूभागात घरे बांधल्याचे जानेवारी २०२१ मध्येच उपग्रह प्रतिमांवरून समजले होते यावेळी

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
    8 नोव्हेंबर ही तारीख एका महान मराठी साहित्यीकाची जयंती, म्हणून मराठी सारस्वतात परीचित आहे. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे हे त्या साहित्यकाचे नाव. त्यामुळे मराठी साहित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व सारस्वतांना मनःपुर्वक शुभेच्छा .      पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला जितकी अमाप प्रसिद्धी लोकप्रियता मिळाली, तितकी समाजमान्यता या लेखनास मिळाली नाही. समाजाने त्यांना कायम विनोदी लेखनाच्या कप्यातच बंदिस्त केले. त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या दोन चित्रपटांमध्येही त्यांवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, असे माझे निरीक्षण आहे, असो       पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर शहरी सुशिक्षीत वर्गाला आवडतील, अस्या पद्धतीचे विनोद पु ल यांनी केले, असा शिक्का म