पोस्ट्स

मे २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांना

इमेज
   आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .        महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात . त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही , महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात . स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत . स्वातंत्र्य

पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                 यावर्षी अर्थात 2022  साली पंडीत नेहरु यांचे निधन होवून 58  वर्षे पुर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत नसला तरी मानवी आयुष्यात अर्ध शतकाचे विशेष अन्ययसाधारण महत्व आहे . मानव पन्नासीत आला की मागे वळून पाहतोच . त्या अनुषंगाने भारताकडे बघीतल्यास आपणास पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले दिसते . त्यावेळी राजकारणात असणारे कोणीच जिवंत नाही . सध्याचे राजकारण पुर्णत : त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . आणि कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी शिवाय उत्तम दिन तो कोणता असणार ? येत्या गुरुवारी त्यांची 57 वी पुण्यतिथी असल्याने त्यांच्या कार्याचे मी माझ्या अल्पमतीनुसार केलेले मूल्यमापन आपणासमोर मांडत आहे   मित्रानो   नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्ट्री दुर्लक्षून चालणार नाही 1) नियोजन आयोग ते नी