पोस्ट्स

सप्टेंबर ५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणेशाची साडेतीन पीठे

इमेज
. आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने   देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या   काळात त्यांची माहिती करून घेउया . या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले   त्या त्या   ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते .                                मोरगाव - ' भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित ' मोरगाव '. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव . या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे . ब्रम्ह , विष्णू , महेश , सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली . उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला . कमलासूराचे शीर   जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला . आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मो