पोस्ट्स

डिसेंबर ३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समान मानव माना त्यांना

इमेज
        कवीवर्य कुसुमाग्रजांची फटका या काव्यप्रकारातील एक सुप्रसिद्ध कविता आहे, "स्वातंत्र्य देवतेची विनवणी" नावाची. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पुर्ण होवून सुद्धा समाजात असणाऱ्या दोषांबद्दल स्वातंत्र्यदेवता आपल्या भारतीयांना ते दोष दूर करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत आहे, असी कल्पना करुन दैनिक सकाळसाठी लिहलेली ही कविता खरोखरीच उत्तम आहे.(दुर्देवाने ही कविता प्रसिद्ध होवून 22 वर्षे होवून देखील परिस्थिती फारसी बदललेली नाही. किंबहूना " जातीभेद,जून्या गोष्टी सोडून नव्या गोष्टी आत्मसात करणे,  तसेच मराठी भाषेविषयची स्थिती" पुर्वीपेक्षा खालवलेली दिसते, )असो.          या कवितेत महिलांविषयी बोलताना कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात, "समान मानव माना स्त्रीला, देवी म्हणूनी भजू नका, दासी  म्हणूनी  पिटू नका". कवीवर्य कुसुमाग्रज यांनी महिलांविषयी व्यक्त केलेली ही अपेक्षा आपल्या समाजातील अनेक घटकांना देखील तंतोतंत लागू होते. आपल्या भारतातील दिव्यांग व्यक्ती समुह देखील या व्यक्तीपैंकीच एक . आपल्या समाजाचा दिव्यांग व्यक्तींविषयक दृष्टिकोन आता अत्यंत हळूहळू बदलत आहे. त्यामु