पोस्ट्स

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

इमेज
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

इमेज
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

आधुनिकता आणि परंपरा यांच्या अनोखा संगम असलेला भाग सहकारनगर आणि कोथरुड

इमेज
  मी सुरुवातीला शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकहून पुणे शहरात राहायला आलो त्यानंतर काही काळ नाशिकला राहिल्यावर पुन्हा नोकरी निमित्ताने पुणे शहरात राहायला आलो शिक्षण आणि नोकरी दोन्ही कालखंडाचा एकत्रित विचार करता मला सध्या पाचहून अधिक वर्षाचा पुणे शहराचा अनुभव आहे .मात्र या संपूर्ण कालावधीत थोड्या महिन्याचा कालावधी वगळता  माझा संपूर्ण वावर टिळकरोड सदाशिव पेठ  फार लांब म्हणायचे झाल्यास दांडेकर पूल आणि महात्मा फुले मंडई य भागातच होता . किंबहुना सदाशिव पेठेत जन्माला आला सदाशिव पेठेतच जगला आणि सदशिव पेठेतच मेला असे माझे जीवन होते . मी जेव्हा माझ्या मित्रांना नाशिकला ते पुणे शहरात कुठे राहतात असे विचारायचो (म्हणजे अजून देखील भेटलो की विचारतो ) तेव्हा ते सांगायचे कि मी हडपसरला राहतो वाघोलीला राहतो नऱ्हेत राहतो . मात्र कॉलेजचे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने सदाशिव पेठेत असल्याने मी पुणे शहरात असून देखील या भागात फार कमी जात असे.  या वेळी मात्र अरे आपण इतकी वर्षे पुणे शहारत राहतोय तरी आपल्याला पुणे शहर अजून पुरते माहित झालेले नाही असे वाटल्याने मी ठरवून ऑफिसच्या सुट्टीच्या ...

पुणे शहराच्या वैभवशाली वारशाचे विद्यमान प्रतीक 'पेठा (भाग २ )

इमेज
  पुणे शहर मोठे विविधरंगी आहे. आपण ज्या शहरात आता राहतोय .त्या शहराच्या आतापर्यंत न गेलेल्या भागाची किमान तोंड ओळख आपणास असावी म्हणून मी सुरु केलेल्या पुणे शहराच्या विविध भागात फिरण्याच्या गोष्टीमुळे मला याची अधिक ठळकपणे जाणीव होत आहे ,माझ्या  आतापर्यंतच्या अनुभवानुसार पुणे शहरातील प्रत्येक भागाचे स्वतःचे एक वैशिष्ट आहे. पुणे शहरातील मूळ भाग असलेल्या पेठा देखील यातून सुटलेल्या नाहीत .फार पूर्वीपासून पुणे शहराच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा भाग असलेल्या या पेठांतील विविधता मी मार्च आणि एप्रिल महिन्यात स्वतः अनुभवली. ती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेल्या लेखाच्या पहिल्या भागात  आठवड्यातील वारांची नावे नसलेल्या पेठांमधील मला अनुभवायास आलेली  बहुढंगी विविधता आपणास समजली.या लेखाच्या दुसऱ्या भागात आठवाड्यतील वारांच्या  नावाने  असलेल्या पेठांमधील मला जाणवलेले वैविध्य  विविधता आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हे लेखन  सोमवार पेठेत पारंपरिक निवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आढळते. जुन्या वाड्यांसोबतच काही नवीन इमारतीही आहेत. येथे किराणा दुकाने, औषध दुकाने, लहान उद्योग ...

पुणे शहराच्या वैभवशाली वारशाचे विद्यमान प्रतीक 'पेठा (भाग १ )

इमेज
 पुणे महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे तर शैक्षणिक सामाजिक सुधारणा, या साठी प्रसिद्ध असलेले तसेच भारताच्या औद्योगिक विकसत भरीव वाटा उचलणारे भारताला मोठ्या प्रमाणात परकीयचलन  मिळवून देणारे शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे  .पुणे शहर आपल्या अनेक  इतर ठिकाणी सहजा न आढळणाऱ्या  गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे .पुणे शहारत असणाऱ्या काही गोष्टी पेठांची परंपरा या सोलापूर,जळगाव या शहरात दिसतात . मात्र पुणे शहरातील या पेठा आणि इतर शहरातील पेठा या फक्त नावाला सारख्या आहेत बाकी या मध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची आपणास माहिती असावी म्हणून मी काही दिवसापूर्वीच या पेठांना भेट दिली त्यावेळी मला आलेल्या अनुभवाचे हे कथन मी आतापर्यंत जे पुणे शहरात राहिलो त्यासारख्या जवळपास ९७ ते ९८ भाग मी सदाशिव पेठ, नवी पेठ आणि नारायण पेठांमध्ये घालवला आहे .या माझ्या नेहमीच्या रुळलेल्या अनुमानांपेक्षा माझा इतर पेठांतील अनुभव खूपच उत्तम होता  पुणे शहरातील   पेठा या प्रामुख्याने पेशवेकालीन नियोजनातून विकसित झालेल्या असून त्या काळात विशिष्ट व्यवसाय, व...

जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )

इमेज
  पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर्वच प्रकारात होत आहेत त्यामुळे पुस्तकाचे वितरण साठवणूक यात देखील मोठया प्रमाणात  बदल होत आहे. या बदलामुळे सध्या आहे त्या प्रकारे प्रकाशकाचे स्थान राहिला का अशा प्रश्न देखील काही प्रमाणात उपस्थित होत आहे. प्रिंटेड पुस्तकाच्या बाबत लेखकाला मेंदू म्हटल्यास ज्याला हृदय म्हणावे लागेल असा घटक म्हणजे प्रकाशक असतो.एकवेळ मेंदू काम करेनासा झाला तरी व्यक्ती कोमात  जाऊन जिवंत राहू शकतो.  मात्र हृदयचे तसे नसते.  हृदयाचा खेळ संपला कि मानवाचा मृत्यू होतो आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मनुष्याच्या मृत्यू म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे असे समजते . हे समजून घेतल्यास पुस्तकाच्या बाबत प्रकाशक किती महत्वाचा असतो हे अंजुटे आणि सध्या पुस्तकाच्या क्षेत्रात होणारे बदल या प्रकाशकलालाच बाहेरचा रस्ता दाखवत आहेत यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे  तर पुस्तकांच्या क्षेत्रातील हृदयाला अर्थात प्रकाशकला धडकी भरवणारा घटकाचे नाव आहे पुस्तक ऑन डिमांड ज्यात...

आता फक्त ५ बाकी!

इमेज
  सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची . अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास्टर पात्रता नि...

अनेक लष्करी आणि देशासाठी महत्त्वाच्या संस्थांचे माहेरघर- पुणे (भाग 2)

इमेज
  विश्रांतवाडी, येवरडा परिसरातील संस्था बघून झाल्यावर माझी पुणे परिसरातील संस्था बघण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढल्याने, त्यानंतर पुढच्या साप्ताहिक सुट्टीची वाट न बघता खास त्यासाठी सुट्टी काढत दोनच दिवसापुर्वी औंधपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कडेकडेने सुप्रसिद्ध ( स्पष्ट बोलायचे तर वाहतूकीचा प्रश्नामुळे बदनाम झालेल्या) अस्या चांदणी चौकापर्यत प्रवास केला.यावेळी मात्र स्वत:च्या गाडीचा वापर केला. मागच्यावेळेप्रमाणे याही वेळेला पुणे शहराचे एक वेगळेच भव्य स्वरुप दिसले. प्रामुख्याने पुणे शहर म्हटले की, लोकांसमोर हिंजवडी येथील तसेच मगरपट्टा परीसरातील आयटी कंपन्या समोर येतात.काही म्हाताऱ्या लोकांसमोर टेल्को सारख्या कंपन्या समोर येतात.मात्र या सर्वांपेक्षा पूर्णतः वेगळे पुणे या ठिकाणी आहे.मागच्या वेळच्या प्रमाणे याही वेळी तोच प्रश्न समोर आला.पुणे शहराच्या जवळ असलेल्या याराष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेत मराठी माणूस किती.असो तर वाचक मित्र मैत्रीणीनो मला औंध ते चांदणी चौक या रस्त्याने जातांनामला या वेळी पुढील संस्था दिसल्या. Defence Research and Development Organisation चे ऑफिस...

अनेक लष्करी आणि देशासाठी महत्त्वाच्या संस्थांचे माहेरघर- पुणे (भाग 1)

इमेज
  आपण ज्या शहरात राहतो, त्या शहराची किमान आपल्याला तोंड ओळख असावी, या हेतूने मी सध्या ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पुणे शहरातील विविध भागांना पीएम पीएल बस, मेट्रो आणि स्वतःची गाडी या माध्यमातून भेट देत आहे. हे आपणास एव्हाना माहिती झालेच असेल.  माझ्या याच भटकंतीमध्ये मी नुकतीच मी नगर रोडवरील कल्याणी नगर, येरवडा, वडगाव शेरी, चंदन नगर, आदी भागातून भोसरी मोशी या भागात तसेच पुढे निगडी, चिंचवड, खडकी भागात जायचे ठरवल्यास कोणकोणते भाग येतात ? तसेच या भागात प्रवास करायचा असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा काय सोय आहे या प्रकारची माहिती घेण्यासाठी  पी एम पी एल च्या 149 क्रमांकाच्या बसने एका दिवसाचा पास काढून भटकंती केली. या 149 बस क्रमांकाच्या भटकंतीमुळे मला पुणे शहराची एक नवी ओळख प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लष्करी आणि अन्य महत्वाचा संस्थेचे माहेरघर असणारे पुणे शहर. सर्वसाधारणपणे बोलायचे झाल्यास पुणे शहरातील लोहगाव आणि विश्रांतवाडी भागात लष्कराची काही ऑफिसेस आहेत अशी सर्वसाधारण माहिती अनेकांना असते. मात्र ती कोणती आहेत, किती आहेत याविषयीची माहिती अनेकांना नसते. मला सुद्धा नव्हती. म...

रेल्वेचे काहीसे उशिरा पडलेले मात्र अतिशय उत्तम पाऊल 'रेल वन ऍप्लिकेशन'

इमेज
  आपल्या  भारतातील प्रशासन मोठे अजिब रसायन आहे.नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करताना संबंधित यंत्रणा नक्की कोणता विचार करतात ? याचा अंदाज बांधता येणे भल्याभल्या देखील शक्य होणार नाही अश्या प्रकारचा या यंत्रणांच्या कारभार असतो.  मात्र नंतर आलेले अनुभव लक्षात घेत  या उपाय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात हेही तितकेच खरे.  हे बदल बघितले तर हे बदल आधीच का केले नाहीत ? असा प्रश्न सर्वसाम्यांना नक्कीच पडेल असे या यंत्रणेचे काम असते. अगदी रेल्वेसारख्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीचा  उपक्रम देखील या कचाट्यातून सुटलेला नाही रेल्वेचे 'रेल वन हे ऍप्लिकेशन'  हे याचे एका उत्तम उहदाहरण म्हणता येईल  रेल्वेचे अनरिझर्वड तसेच रिझर्वेशन करणे , गाड्यांची सध्याची स्थिती बघणे आपल्या रिझर्वेशनची स्थिती बघणे,पास काढणे दोन स्टेशन दरम्यान किती ट्रेन धावतात त्यांची डब्यांची स्थिती काय आहे ? प्रवासादरम्यान खाण्याची सोय करणे,रेल्वेकडून काही मदत मागवणे, रेल्वेच्या कारभाराबाबत तक्रारी करणे, प्रवासादरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाची सोय करणे, रेल्वेबाबतची छान छ...

तीन दिवस, तीन स्थळे रेल्वेमार्फत ... 

इमेज
व्यक्तींनी त्यांच्या धावपळीच्या  आयुष्यात काही वेळ तरी त्यांच्या छंदासाठी द्यावा.छंदासाठी दिलेला वेळ आणि खर्च केलेला पैसे ही वेळ आणि पैशाची उधळपट्टी नसते.  तर धावपळीच्या आयुष्यात जगताना दमछाक होऊ नये, रोजच्या आयुष्यात जगताना सामोरे जावे लागणाऱ्या ताणतणावांना सहजतेने  सामोरे जाता यावे,  म्हणून ताकद मिळावी यासाठी केलेली ती गुंतवणूक असते, असे अनेक  मानसशास्त्रज्ञ सातत्याने सांगताना आपण ऐकतो, बघतो.  हिंदी आणि मराठी भाषेत छंदाचे महत्व सांगणारे 'जब वी मेट' सारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर आपल्या रोजच्या आयुष्यातील हेच छंदाचे महत्त्व लक्षात घेत रोजच्या धावपळीतून काहीसा ब्रेक घेत काही दिवसापूर्वी  मी ३ दिवसात तीन स्थळे बघितली. विशेष म्हणजे माझ्या नेहमीच्या एसटी बस चा माध्यमातून ही स्थळे बघण्याच्या ऐवजी मी ही स्थळे बघितली ती रेल्वेच्या माध्यमातून.  पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटण्याची वेळ,  स्थळ दर्शनाचा कालावधी, माघारीचा कालावधी लक्षात घेत साधारणतः सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे स्थानकावर परत येता येईल, असा विचार करत मी ही स्थळे ...

ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग २ )

इमेज
 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या पुणे शहारला मोठा इतिहास लाभला आहे हे आपणास माहिती आहेच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने या शहरातील सर्वच भागाचे आपले असे स्वतंत्र्य इंग्रजीत ज्याला युनिक असे म्हणतात असे एक वैशिष्ट आहे.  अगदी शहराची उपनगरे देखील यातून सुटली नाहीत.  अगदी हडपसर असे एकही काना, मात्रा,वेलांटी ,उकार नसलेले साधे सोपे उच्चार असलेले उपनगर देखील यातून सुटू शकले नाही. हे मला समजले ते, आपण  जिथे काम करतो त्या शहराची आपणास माहिती असावी या हेतूने मी सुरु केलेल्या फिरण्यातून .  तर वाचक मित्र- मैत्रिणींनो मी २९ मार्च आणि ५ एप्रिल रोजी फिरण्याच्या उद्देशाने हडपसरची सैर केली हे आपण जाणताच. पहिल्यावेळी २९ मार्चला स्वारगेटहून सोलापूरकडे जाताना डाव्या हाताला जो हडपसरचा भाग लागेल त्या भागाला भेट दिली होती.त्या विषयीच्या लेखाला  तुम्ही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक आभार .या भेटीला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यामुळे उर्वरित हडपसरला भेट देण्याची माझी  ताकद व...

नेमीची  येते अवकाळी 

इमेज
  मी हा मजकूर लिहीत असताना पुणे शहर परिसरात अवकाळी पावसामूळे नागरिक धास्तावले आहेत. २ एप्रिल रोजी दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे परिसरात एका मराठी वाक्यप्रचाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे तो म्हणजे ' नेमीची  येते अवकाळी'   नेमेची येतो पावसाळा या मराठी वाक्यप्रचारात  पावसाळी  या शब्दाचा जागी अवकाळी हा शब्द बदल करत  ही चर्चा रंगली आहे  तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५  वर्षाचा आढावा घेतला तर या वर्षात मार्च  ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हेचक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच .तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील तर पुढच्या वेळी तुम्ही  फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.  मात्र असे असले तरी  देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे आपणांस ...

ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग १ )

इमेज
  आपल्या मनुष्याच्या स्वभाव मोठा विलक्षण आहे.  मनुष्य त्याच्या जवळ जे आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि दुसऱ्या ठिकाणच्या वस्तूचा शोध घेतो . जर  आपण मानवी स्वभावाचे तटस्थ पद्धतीने निरीक्षण केले तर मानव प्राण्याने हा नियम सर्व ठिकाणी वापरला असल्याचे लक्षात येते अगदी आपण राहतो त्या प्रदेशाला सुद्धा हा नियम लावल्याचे आपण सहज दिसून येते. आपण काय इथेच राहतो हा भाग कधीही बघता येईल, या  समजुतीतून आपण राहतो त्या शहरातील अनेक भाग ना बघितलेले सुद्धा आपणास अनेक जण सापडू शकतात. किंबहुना आपण राहतो आणि आपण व्यवसाय, नोकरी करतो त्या परिसरात बघण्यास फारसे काही आढळलेले  नसल्याने  (मुळात तो त्यांचा दोष असतो, त्या भागात देखील अनेक बघण्याचे भाग असतात मात्र रोजच्या जगण्यात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा तशी दृष्टी नसल्याने त्यांना ते सापडत नाहीत )  शहराच्या इतर भागात देखील तसेच असल्याचे वाटून जाते आणि ते एका मोठ्या खजिन्याला मुकतात.  माझ्याकडून ही  चूक होऊ नये म्हणून मी पुणे शहराचे एक अप्रतिम उपनगर असलेल्या हडपसरला नुकतीच भेट दिली. हडपसर उपनगर पर्यटनाच्या निम...