पोस्ट्स

डिसेंबर ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशांत ,अस्वस्थ इशान्य भारत

इमेज
 आपल्या भारताचा एका टोकाला , दुर्लक्षीत असणाऱ्या इशान्य भारत सध्या प्रचंड खदखदतोय. नव्या राज्याचा मागण्या, लष्कराच्या कारवाया, राज्यांचे आपसातील सीमावाद  यामुळे इशान्य भारत सध्या एका तापलेल्या तव्याप्रमाने झाला आहे. ज्यावर इतर विनाकारण ताणलेले अस्मितेचे केलेले प्रश्न बाजूला ठेवून विचार करण्याची नितांत गरज आहे.           त्रिपूरा राज्यातील त्रिपरा या जनजातीने त्याच्यासाठी स्वतंत्र त्रिपरालँड या राज्याची मागणी केली आहे.त्याच्यासाठी त्यांनी राज्यात आंदोलने केल्यावर नवी दिल्लीत देखील आंदोलने केली आहेत. सध्या त्रिपूरा राज्यात भाजपाचे सरकार आहे.प्रस्तावित नव्या राज्याला काँग्रेस, आप आदी सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेशबरोबर 820 किमीची सीमा शेअर करणारा इशान्य वगळता अन्य सातही दिशांना बांगलादेश हा देश असलेला, स्वतःच्या भौगौलिक स्थानामुळे भारताला बांगलादेशामध्ये अंतर्गत भागात काय चालू आहे? याची माहिती घेण्यास साह्य करणारे राज्य म्हणजे त्रिपूरा. म्यानमारबरोबर सिमा असणाऱ्या मिझोराम या छोट्या राज्याबरोबर सीमा असणारे, राज्य म्हणजे त्रिपूरा 19 जनजातीय राहत असणारे ,भारतीय सविधानात

सांघिकता आणि बुद्धिबळातील यश (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग८ )

इमेज
      मागील भागात आपण वैयक्तिक मानसिकतेचा बुद्धिबळातील यशापयशावर काय परिणाम होतो ? हे बघितले या भागात आपण सांघिकता आणि बुद्धिबळ यातील सहसंबध बघणारा आहोत सांघिक खेळातूनही बुद्धिबळात भरपूर काही शिकता येते . जुलै २०१८ मध्ये फिफा वर्ल्ड कप मध्ये इतिहास घडला ५ वेळा विश्वविजेता असणाऱ्या ब्राझीलला हरवून तब्ब्ल ३२ वर्षांनी बेल्जीयमने उपांत्य फेरी गाठली याच्या आधी १९८६ मध्ये बेल्जीयमचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला होता युरोकप २०००मध्ये बेल्जीयम पहिल्या फेरीतच बाद झाला होता. त्याची बोज बेल्जीयम संघाला लागून राहिली माजी फुटबालपटू मायकल सेबलोन यांच्यावर संघ तयार करण्याची जवाबदारी देण्यात आली त्यांनी तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन एक उत्तम आरखडा (ब्लु प्रिंट ) तयार केला प्रथम त्यांनी खेळण्याची पद्धत बदलली .  विजयावरच लक्ष केंद्रित केले प्रक्षिक्षकांची संख्या वाढवली नॅशनल फुटबॉल सेंटर उभारले अश्या बऱ्याच गोष्टीमुळे बेल्जीयम उपांत्य फेरीत पोहोचला  मागच्या लेखात आपण बघितल्याप्रमाणे वैयक्तिक मानसिकता आणि वर उल्लेख केलेल्या संघ भावनेचा विचार केला असता आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते की , दोन प्रकारच्या मानस