पोस्ट्स

जून १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवाने दिलेल्या संधीचा किती फायदा उचलणार आपण ?

इमेज
         आपल्या जगात अधिकृतपणे २१० देश आहे त्यापैकी एक म्हणजे आपला भारत हा देश आहे जगातील सर्व धर्मियांच्या देवांचा विचार करता सर्व देवांचा या २१० देशांमध्ये अत्यंत आवडता देश आपला भारत देश असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आपण मात्र या सुसंधीचा वापर करत स्वरक्षणार्थ काही करण्याऐवजी, सर्वकाही  देवाच्या भरोवश्यावर  सोडले असल्याचे चित्र आपल्या भारताच्या हवामान बदलाच्या संकटाच्या बाबतीत  कृती कार्यक्रम बघून वाटते आहे        आजमितीस जून२०२२ मध्ये चिली या देशात दुष्काळ पडून जवळपास १३ वर्षे झाली आहेत . सलग १३ वर्षे दुष्काळ पडल्याने येथील जंगलातील पाणवठे पूर्णतः सुकल्यात जमा आहे तेथील जंगलात फिरल्यास जागोजागी विविध मृत जनावरांचे अस्थिपंजर पडल्याचे दिसून येत आहे पाणवठे सुकल्यामुळे त्यावर अवलुबुन असणारे बोटिंग स्विमिंग या सारखे व्यवसाय पूर्णतः ठप्प पडले आहेत त्यावर पोट भरणारी जनता पूर्णतः बेरोजगार झाली आहे दक्षिण आणि उत्तर अमेरिकेचा एकत्रित विचार करता या खंडाच्या नैऋत्य दिशेला (दक्षिण पश्चिम ) पाऊस नसल्याने जनता त्रासलेली असताना याच खंडाच्या वायव्य दिशेला ( उत्तर पश्चिम ) पावसाने जनजीवन ठप्प झाले