पोस्ट्स

जुलै १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवा तूझे दिवस भरत आले आहेत!

इमेज
      आपल्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरीवर्ग  चिंतेत सापडला असताना जगभरात विविध ठिकाणी हवामानाने मानवाचे दिवस भरल्याचे स्पष्ट संकेत दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे . .  कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसात  नोंदवण्यात आलेले तापमान हे याचीच साक्ष देतात  कँनडा सारख्या अन्यवेळी उन्हाळ्यात देखील 25 ते 30 अंश सेल्यीयस तापमान असणाऱ्या देशाच्या पश्चिम भागात 49.5 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद झाली आहे. कँनडा या देशाच्या एक तृतीयांश भाग हा जगात सर्वात थंड भाग म्हणून परीचीत असलेल्या ध्रुवीय प्रदेशात मोडतो,हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.  कँनडा या देशाच्या ब्रिटीश कोलंबिया या राज्यात हा मजकूर लिहीत असताना तब्बल 145 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर संपुर्ण कँनडा देशात हा आकडा 300 च्या आसपास आहे. कँनडा सारख्या जगातील सर्वात मोठ्या 7अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचा समुहातील अर्थात   जी 7 मध्ये मोडणाऱ्या देशात असी स्थिती आहे. हे विशेष. जगात राहण्यास उत्तम देशांचा निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये सुद्धा  कँनडा पहिल्या दहामध्ये येतो हे आपण लक्षा