पोस्ट्स

जुलै १०, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंगळ भाशा कंची ?

इमेज
काल मिञांच्या बरोबर कटट्यावर बसलेलो असताना एक मिञ सहजच ग्रामीण भाषेत बोलू लागला  शुध्द भाषेत बोलत आहेस ?  आणी हे बघून आमच्यातील एक जणाने त्यास म्हटले काय अशुध्द भाषेत बोलत आहेस   आतापर्यतचे समस्त जीवन शहरात घालवणार्या या माझ्या मिञाने ग्रामीण भाषेला सरळ सरळ अशुध्द ठरवले होते , माञ दुर्दैवाने हे ठरवताना तो हे विसरला की इंग्लीश भाषेत सुध्दा (माझ्या मते इंग्लीश हे विशेष नाम आहे सबब त्याचे इंग्रजी असे भाषांतर करणे गैर आहे )पण अमेरीकन इंग्लीश आणी ब्रिटिश इंग्लीश असे दोन मुख्य (आणी कित्येक उप प्रकार ) प्रकार आहेत हे दोन प्रकार निमुटपणे मान्य केले जातात त्यात शुध्द आणी अशुध्द असे वर्गीकरण केले जात नाही मग मराठीतच असे वर्गीकरण का केले जाते ? ग्रामीण मराठीला अशुध्द म्हणून हिणवणार्या कडे बहूथा या प्रश्नांचे उत्तर नसते ते व्याकरणाचा आधार घेउन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात माञ माझ्या मते व्याकरण वाक्यरचना कशी असावी ते शिकवते त्यात कोणते शब्द असावेत हे शिकवत नाही मराठीत कर्तरी प्रयोगाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास कर्ता +कर्म +क्रियापद अशी रचना करण्याचे व्याकरण सांगते खुप या शब्दा ऐवजी लई शब्द