पोस्ट्स

फेब्रुवारी २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलती शेजारची गणिते (भाग3)

इमेज
आपल्या भारताच्या 27 पैकी संवेदनशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर या राज्यांबरोबर एकंदरीत 1600 किमीची सीमा शेअर करणाऱ्या म्यानमारमध्ये 2021 फ्रेबुवारी1 रोजी लष्करी उठाव करुन जेमतेम बाळसे धरणाऱ्या लोकशाहीला गुंडाळल्यानंतर हा लेख लिहण्यापर्यत त्याविरुद्ध म्यानमारच्या नागरीकांनी जोरदारपणे आंदोलन सुरु केले आहे. म्यानमारला ब्रिटीश सत्तेपासून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1962 पर्यत लोकशाही नांदल्यावर 1962 मध्ये उठाव करुन लष्कराने तेथील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून 2011 ते2021 चा कालखंड वगळता तिथे लष्कराचीच सत्ता राहिली.या 50 हुन अधिक वर्षाच्या लष्करी राजवटीत लोकशाहीसाठी1988आँगस्ट 8 रोजी झालेले आंदोलन आणि 2007 ला आंदोलन झाले .1988आँगस्ट 8 ला झालेले आंदोलन.हे 888 आंदोलन म्हणून ओळखले जाते. या आंदोलनामुळे तेथील लष्करी प्रशासन नमले नाही. मात्र 2007 साली काही महिने चाललेल्या आंदोलनामुळे लष्करी प्रशासन नमले.त्यांनी लोकशाहीचा देखावा तयार करण्यासाठी एक संविधान तयार केले. ज्यानुसार 2020 नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत गैरप्रकार झाले असे सांगून तेथील लष

राष्ट्रीय विज्ञानदिन विशेष !

इमेज
आजपासून 91वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सन 1930 मधील . त्यावेळी पारतंत्र्यात, वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत  असणाऱ्या भारत या देशातील चंद्रशेखर वेंकटरामन् या शास्त्रज्ञाने लावलेल्या अदभूत शोधाची. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरीतील उर्जा आणि विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा यात फरक असतो. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरी पेंक्षा विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा कमी किंवा अधिक असू शकते, हाच तो शोध. ज्याला आज रामन् इफेक्ट म्हणून ओळखले जाते. या शोधामुळे चंद्रशेखर यांना भारतरत्नासह, ब्रिटीश सरकारकडून मानाचा सर या पुरस्कारसह जगभरात प्रख्यात असलेला भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार  आणि अन्य प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले. . हा शोध जाहिर झाला तो 1930 फेब्रुवारी 28 ला . आज भारतात आपण हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो.त्यानिमित्ताने सर्व विज्ञानप्रेमींना खुप खुप शुभेच्छा.              आज रामन इफेक्टचा वापर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या अनेक ठिकाणी करण्यात येतो. आजच्या अद्यावत प्रकाशलहरींच्या अभ्यासाचा पाया हा रामन इफेक्टवर आधारित आहे, जो