पोस्ट्स

जुलै १३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जन्मकथा भारतीय अवकाश संशोधन संस्थेची

इमेज
      येत्या सोमवारी 15 तारखेला भारताच्या चंद्रयान 2ला सुरवात होईल .अन्य माध्यमातून चंद्रयानाचे विविध  टप्यांविषयी  आपणास माहिती मिळेलच, त्यामुळे परत मी काही  यावर  बोलणार नाही . मी बोलणार आहे ,चंद्रयानाचा  पालक संस्थेविषयी अर्थात इंडीयन स्पेस रिसर्च आँर्गनाझेशन किंवा जीला इसरो  या आद्यक्षरांनी ओळखले जाते त्या विषयी .  इसरो ही जगातील प्रमुख अंतराळ संस्था आहे . .  मुख्यतः भारत  कार्यक्षेत्र असले तरी भारताशेजारील छोट्या राष्ट्रांना देखील इसरो आपली सेवा पुरवते . या संस्थेचे मुख्यालय बंगळुरू आहे मात्र भारतात विविध ठिकाणी या संस्थेच्या विविध कार्यानंतर्गत  विविध कार्ये केली जातात . त्याची थोडक्यात माहिती लेखाच्या शेवटी  देण्यात येत आहे .                          इसरोची   स्थापना  भारतीय अणू विभागांतर्गत   15  ऑगस्ट 1969 ला करण्यात आली. संस्थेचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई होते . भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून 1962 साली  उभारण्यात आलेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या सं स्थेला पुढे इसरो असे संबोधण्यात येऊ लागले .  या संस्थेची प्रसाशकीय रचना प