पोस्ट्स

जुलै १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल [भाग 4]

इमेज
        आजमितीस जगाचा विचार केला असता एकच  मुदा चर्चेत आहे तो म्हणजे अफगाणिस्तान .  दररोज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरशी आणि अफगाणिस्तानच्या सरकारची पीछेहाट या बाबतच्या  बातम्या अतंराष्ट्रीय माध्यमे सातत्याने  देत असतात .  समर्थ रामदास स्वामी यांच्या ''जे जे आपणशी ठाव ते ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण'' या उक्तीनुसार ते आपणापर्यत पोहोचवण्यासाठी  आजचे लेखन .  तर मित्रानो , अफगाणिस्तानच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर ताबा आलेल्या आणि दिवसोंदिवस तो मोठ्या प्रमाणात वाढत  असलेल्या तालिबानकडून तुर्की या देशाला कडक इशारा देत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे जर तुर्की अफगाणिस्तान हा देश सोडून न गेल्यास आम्ही त्यांच्यावर परदेशी लोकांचे स्वदेशावर आक्रमण असे समजून  हल्ला करू . यामध्ये होणाऱ्या नुकसानीस तुर्की लोकच  जवाबदार असतील असे तालिबानकडून जाहीर करण्यात येत आहे . शीतयुद्धाच्या वेळी त्यावेळेच्या कम्युनिष्ट प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने उभारलेली लषकरी संघटना म्हणजे नाटो. अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन   या नाटोचा   मुस्लिम बांधव बहुसंख्येने असणारा देश म्