पोस्ट्स

बुद्धिबळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आता फक्त ५ बाकी!

इमेज
  सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची . अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास्टर पात्रता नि...

भारत बुद्धिबळातील महासत्ताच !

इमेज
        भारत बुद्धिबळातील महासत्ताच  ! होय,  भारत बुद्धिबळातील महासत्ता आहे,  आणि मी आंधळा देशप्रेमी म्हणून म्हणत नाहीये.  बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या फिडे या  संघटनेतर्फे एप्रिल २०२५ मधील टॉप १०० खेळाडूंची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या आधारे  मी हे  विधान करतोय .       तर मित्रानो  फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  फेडरेशन इंटरनॅशलनल डी इचेस या बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्थेमार्फत एप्रिल २०२५ च्या टॉप १००  पुरुष खेळाडूंच्या यादीतील पहिल्या १५ मध्ये ५  खेळाडू भारतीय आहेत. फिडेकडून खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनावर आधारित काही गुण दिले जातात ज्याला इलो रेटिंग म्हणतात या इलो रेटिंगच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे .  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश,   चवथ्या क्रमांकावर ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी सातव्या क्रमांकावर ग्रँडमास्टर आर प्र...

भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची वर्षाखेर गोड!

इमेज
  बुद्धिबळ प्रौढ पुरुष गटात क्लासिकल (पारंपारीक) पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद मिळवण्याचा भीम पराक्रम ग्रँड मास्टर डी.गुकेश यांनी करून काहीच दिवस होत नाही. तोच भारतीय बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारी अजून एक बातमी २९डिसेंबर रोजी येवून धडकल्याने, भारतीयांना अक्षरश:आकाश‌ ठेंगणे झाले.‌भारतीय प्रमाणवेळेनुसार २७ते २९ डिसेंबर या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळात न्युयॉर्क येथे खेळवण्यात (न्युयॉर्कच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार २६ते २८डिसेंबर दुपारी अडीच वाजता )आलेल्या जागतिक  प्रौढ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा महिला गटात भारताची क्रमांक एकची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी विजेतेपद मिळवत रॅपिडचे विश्वविजेतेपद पटकावल्याची,हीच ही बातमी.   तूम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल हे काय? गुकेश तर आताच विश्वविजेता झाला आता हे काय ? नविन.तर सांगतो जागतिक स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा गटात खेळवण्यात येतात या गटाचे वयानुसार ३गट पडतात .12 वर्षाखालील खेळाडू ज्या गटात खेळतात त्यास सब ज्युनियर गट म्हणतात. खेळाडु 12 वर्षापेक्षा मोठा मात्र 19 वर्षा...

भारताची बुद्धिबळातील यशाची चढती कमान

इमेज
                        सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेशने विश्वविजेतेपदाला गवसणी घालून समस्त भारतीयांना आनंदाची अनुभती देवून आठवड्याचा कालावधी पुर्ण होतो ना होतो, तोच भारताने बुद्धिबळाच्या बाबत अजून एक यश मिळवले आहे‌.भारताचे हे यश आहे, 'आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'                                          बँकॉक येथे १डिसेंबर ते ११डिसेंबर या दरम्यान झालेल्या,  आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'  भारताने १८सांघिक आणि १५ वैयक्तिक पदके मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.सांघिकरीत्या मिळवलेल्या १८पदकांमध्ये ३ सुवर्ण, १०रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत तर वैयक्तिकरीत्या मिळवलेल्या १५पदकांमध्ये ४सुवर्ण २रौप्य आणि ९ कांस्य पदके मिळवली आहेत. दिवी बिजेशने क्लासिकल आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करत दुहेरी सुवर्ण पदक  जिंकले.तिने स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वच्या सर्व सामने जिंकल...

असा झाला बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा प्रवास

इमेज
  चेन्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश हे चीनचा नागरिक ग्रँडमास्टर माजी विश्वविजेता डिंग वीरेन यास जागतिक बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धा २०२४ च्या १४ व्य फेरीत नाट्यमयरित्या   हरवून नवे बुद्धिबळ विश्वविजेते झाल्याचे एव्हाना आपणास समजले असेलच मात्र हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता , आणि गेल्या तीन आठवड्यापूर्वीच सुरु झालेला नव्हता .तर त्यासाठी किमान २ वर्षाची अथक तपश्चर्या होती    जागतिक बुद्धिबळ स्पर्धा लौकिक अर्थाने २५ नोव्हेंबर २०२४ ला सुरु झाली असली तरी ती जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल ही स्पर्धा मागच्या वर्षी २०२३ ला सुरु झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल २०२३ साली बुद्धिबळाची जागतिक स्तरावर नियमन करणारी संस्था फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस अर्थात फिडे या संस्थेकडून खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने ग्रँडमास्टर डी गुकेश या स्पर्धामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे ते बुद्धिबळ विश्वविजेत्याला कोण आव्हान देणार हे ठरवणारी   कॅन्डीडेट स्पर्धा खेळण्यास पात्र ठरले  कॅन्डीडेट स्पर्धा जगातील अव्वल अश्या ...

बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेची चढती कमान

इमेज
                    सिंगापुर येथील सेंटोसा आयलंड येथे बुद्धीबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा सुरु आहे. तिथे चीनचा नागरिक वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लिरेन  आणि २०२४चा कँडीडेट स्पर्धा विजेता आपल्या सर्वांचा आवडता लाडका सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यांत  अटीतटीची लढाई सुरु आहे. हे तूम्हाला एव्हाना माहिती झाले असेलच.भारताचे पहिले ग्रँडमास्टर असणारे भारतीय बुद्धिबळातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले विश्वनाथन आनंद हे या आधी ही स्पर्धा खेळले होते.त्यानंतर सुमारे १२वर्षांनी कोणता तरी भारतीय ही बुद्धिबळातील ही अत्यंत मानाची स्पर्धा खेळतोय.जे आपल्या समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.अमेरिका आणि रशियाचे बुद्धिबळावर असलेले वर्चस्व मोडीत काढत नार्वे, चीन आणि आपले भारतीय  खेळाडू यात उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे,ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे‌                   हा लेख लिहण्यापर्यत स्पर्धेतील ९ सामने झाले आहेत, ज्यामध...

रंगणार भारत आणि चीनचे युद्ध ६४ घराच्या पटावरं

इमेज
             येत्या मंगळवार २६ तारखेपासून भारत आणि चीन यामध्ये एक युद्ध रंगणार आहे मात्र घाबरायचे काहीच कारण नाही . कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाहीये .  हे युद्ध रंगेल सिंगापूर येथील  पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये . या युद्धात भारताकडून प्रतिनिनित्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या ६४ स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट २०२४ स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे,हे युद्ध खेळवण्यात येईल .               बुद्धिबळाचे पारंपरिक पद्धतीचे अर्थात बुद्धिबळपटूच्या भाषेत क्लासीकल पद्धतीचे एकूण १४ डाव या युद्धात खेळवण्यात येतील २६ तारखेपासून दररोज एक सामना खेळवण्यात येईल ..३ सामने झाल्यावर एक द...

कॅन्डिडेट स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा तौलनिक आढावा

इमेज
मित्रानो,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धत विद्यमान बुध्दिबळ विश्वविजेता डिंग लिरेन यांच्याशी कोण दोन हात करत,  त्यांना विश्वविजेता या पदासाठी कोण, आव्हान देणार?  हे ठरवणाऱ्या कॅन्डिडेट २०२४ या स्पर्धेसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले  आहेत कॅनडातील टोरांटो शहरात ३ते २२एप्रिल दरम्यान ही स्पर्धा  होणार आहे.या स्पर्धेतील विजेता विश्वविजेत्यास आव्हान देत असल्याने या सर्व खेळाडूंचा तौलनिक आढावा घेणे ,हे कोणत्याही बुद्धिबळप्रेमींसाठी आवश्यक आहे.  या अभ्यासातून आपण कोणत्या खेळाडूला कॅन्डीडेट स्पर्धा जिंकण्याची, अधिकची संधी असेल ? याबाबत अधिक अचूक अंदाज बांधू शकतो  अर्थात या स्पर्धेतील सर्वच खेळाडू एकमेकांना तुल्यबळ आहेत मात्र तरी त्यांच...

नाशिककरांसाठी क्षण हा अभिमानाचा !

इमेज
  नाशिकने देशाला अनेक रत्ने दिली आहेत.आज अब्जावधींची व्यवसाय झालेल्या बॉलीवूडची उभारणी करणारे दादासाहेब फाळके, ब्रिटीशांना धडकी भरवणारे ज्येष्ठ  क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी,,ही त्यातील काही महत्त्वाची नावे.आता या नावात अजून एक नाव समाविष्ट झाले आहे.ते म्हणजे  सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे नाव.                  बुद्धीबळ विश्वात जागतिक स्तरावर अत्यंत मानाचे जवळपास पहिल्या क्रमाचे मानाचे समजले  जाणाऱ्या "न्यू इन चेस या नियतकालीकाच्या, मुखपृष्ठावर सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. आतापर्यंत न्यू इन चेस या नियतकालिकांमध्ये ज्यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध होतो,अस्या खेळाडुने भविष्यात विश्वविजेते पदाला गवसणी घातण्याचा इतिहास आहे‌.तो बघता नाशिकचे भुमीपुत्र असलेले सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे भावी विश्वविजेते आहेत,हे सुर्याप्रकाश्याइतके स्पष्ट आहे, आणि असा खेळाडू आपल्या नाशिक शहरात राहतो ही समस्त नाशिककरांसाठी अभिमानाची...

भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

इमेज
     या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुक...

भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी सुवर्ण क्षण

इमेज
2डिसेंबर 2023हा दिवस भारतीय बुद्धीबळ क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल. कारण या दिवशी महिला बुध्दीबळ खेळाडू  वैशाली रमेशबाबू  यांनी भारताला 84वा ग्रँडमास्टर मिळवून दिला .  वैशाली यांनी  स्पेनमधील एलोब्रेगॅट ओपनमध्ये सलग 2 विजयांसह दमदार सुरुवात करत ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक अस्या 2500 रेटिंगचा टप्पा ओलांडला ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असे अन्य  तीन निकष या आधीच पुर्ण केल्याने त्यांनी ग्रँडमास्टर भारताचे 84वे ग्रँडमास्टर म्हणून आपले नाव कोरले वैशाली रमेशबाबू आता महिला बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी तर  भारतात  दुसऱ्या स्थानी आहेत.  ग्रँडमास्टर होण्यासाठी पुरुष आणि महिलांचे निकष थोडेसे वेगळे आहेत. पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर होण्यासाठी किमान 2500फिडे गुणांकन आवश्यक आहे.मात्र महिलांना थोडे कमी फिडे गुणांकन आवश्यक आहे.महिलांना ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक असे  फिडे गुणांकन प्राप्त केल्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुस वूमन ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.मात्र त्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुंचे फिडे गुणांकन 2500...

नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

इमेज
          नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे नाशिकचे रहिवासी असलेल्या ग्रँडमास्टर यांनी इंग्लंडमधील आइल् ऑफ मॅन या शहरात खेळविण्यात आलेल्या ग्रँड स्विस या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळवलेले अभिनंदनास्पद यश होय  पाचवेळच्या विश्वेकविजेता मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते अश्या मात्तबर खेळाडूंना नमवत विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे   यातील विजेता आणि उपविजेता हे हे जातात सर्वात उत्कृष्ट असणाऱ्या  अशा आठ खेळाडूंसाठीच राखीव  असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील. त्यामुळे नाशिककर असणाऱ्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची विश्वविजेता होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आणि  तो  देखील  हे विश्वीजेता होण्याच्या मार्ग ज्या स्पर्धेतू...

नाशिकरांसाठी गौरवास्पद क्षण

इमेज
         २३ सप्टेंबर पासून  ८ ऑक्टोबर पर्यतचा कालावधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण नाशिकचे भूमिपुत्र  असणारे तरुणाईचे आयकॉन विदित गुजराथी हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या खेळात भारताच्या पुरुष संघाचे कप्तान असणार आहेत एका नाशिककारास भारताचे नेतृत्व करायची संधी मिळणे ते देखील एशियाड सारख्या महत्वाच्या स्पर्धेत ही समस्त नाशिककरांना अभिनंदनास्पद बाबच म्हणावी लागेल              ही  बुद्धिबळ स्पर्धा जलद (रॅपिड ) प्रकारात खेळवली जाणार आहे फिडे वर्ल्ड कपमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे सर्व भारताला माहिती झालेल्या आर प्रग्ण्यांनंद, यांच्यासह डी गुकेश ,पेंटला हरिकृष्ण, अर्जुन एरिगैसी हे सर्व विदित गुजराथी नेतृत्वात खेळतील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अंत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारतीय पुरुष संघाकडे लागलेल्या असतील महिला संघाचे प्रतिनिधित्व एशियाड या स्पर्धेत वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलेल्या आणि महिला संघालासुवर्णपदक मिळून देण्यात मोलाची भूमि...

फक्त 17कमी !

इमेज
फक्त 17 कमी!  शीर्षक वाचून चमकलात ना? कस्यासाठी 17कमी?, असा प्रश्न तूमच्या मनात निर्माण झाला असेल तर सांगतो , फक्त 17कमी ही बाब, भारताच्या बुद्धीबळ गँडमास्टरच्या संदर्भात आहे. भारताचे हा मजकुर लिहीत असताना 83ग्रँडमास्टर झाले आहेत. अजून १७ ग्रँडमास्टर झाल्यावर भारतात ग्रँडमास्टरांच्या संख्येचे शतक होईल. आपल्याकडे 100 या संख्येचे विशेष महत्त्व आहे. वयाची 100वर्ष पुर्ण करोत, किंवा एखाद्या खेळाडूने 100वा सामना खेळो त्याकडे विशेष बाब म्हणून बघण्यात येते आणि 83 या संख्येत 17 मिळवले की 100 ही संख्या तयार होते.म्हणून म्हटले अजून 17 बाकी आदित्य सामंत हे भारताचे 83वे ग्रँडमास्टर ठरले आहेत.   त्यांनी 28व्या अबू धाबी मास्टर्समध्ये पहिला GM नॉर्म आणि 3ऱ्या एल लोब्रेगॅट इव्हेंटमध्ये दुसरा नॉर्म मिळवला.बील मास्टर टूर्नामेंट ओपनमध्ये शानदार कामगिरीसह, ते भारताचा 83वा जीएम बनले 8 फेऱ्यांनंतर आदित्य यांचे सहा गुण झाले आहेत आणि ते सध्या बिएल मास्टर्सच्या पुढील फेरी खेळत आहेत. मात्र त्यामुळे परिणामावर काही फरक पडत नाही कारण त्यांनी ग्रँडमास्टर नॉर्मसाठी अगोदरच आवश्यक आवश्...

बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची चुरस कायम

इमेज
    सध्या आपल्या भारतात आय पी एल चा ज्वर असला तरी जागतिक पातळीचा विचार करता समस्त जगताचा नजारा बुद्धिबळाचा विश्वविजेता कोण होणार ? याकडे लागलेल्या आहेत .विद्यमान विश्वविजेता   मॅग्नस कार्लसन यांनी त्यांना विश्वविजेता पदाची स्पर्धा खेळण्यात उत्सुकता नसल्याचे जाहीर केल्यावर पहिल्यादाच   होणारी ही स्पर्धा त्यामुळे विशेष ठरत आहे मागील विश्वविजेता पदाचा आव्हानवीर नेपोमनिशी आणि या वर्षाचा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कॅन्डीडेट स्पर्धेचा विजेता डिंग लिरेन यांच्यात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे   काझकिस्तानमधील   अस्ताना शहरात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १४ डाव खेळवण्यात   येणार असून खेळाडूंना जिंकल्यास एक गुण तर सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार असून जो खेळाडू सर्वप्रथम साडेसात गुणांची कमाई करेल त्यास विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे रविवार १६ एप्रिल सायंकाळचा विचार करता स्पर्धेत ६ डाव खेळण्यात आलेले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी दोन विजय आणि दोन डावात बरोबरी असे एकूण ३-३ गुण झाले आहेत दोन्ही खेळाडूंचे स्पर्ध...