पोस्ट्स

ऑगस्ट २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेत वादळाचा प्रकोप !

इमेज
                    एकदा संकटे येण्यास सुरवात झाली की , एकामागून एक येतच राहतात त्यांची एकप्रकारची मालिकाच तयार होते  आपल्याकडे म्हणतात . याचाच अनुभव सध्या अमेरिकन घेत आहेत . आधी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रचंड असे  तापमान आणि वणवे  लागल्यावर आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर निसर्ग त्याचा रुद्रावतार दाखवत आहे . हा मजकूर लिहीत असताना ( 23 ऑगस्ट सायंकाळ ) रोजी हेन्री या हरिकेने अमेरिकेच्या मुख्य भूमीवरील ईशान्य दिशेच्या सात राज्यातील प्रशासनाची झोप उडवली आहे एबीसी या ऑस्ट्रोलिअन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या हरिकेनमुळे तब्बल एक लाख लोक विद्युत पुरवठ्यापासून दूर आहेत हरिकेन जमिनीवर आदळायच्या आधीच तासात 5 सेमी इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . तर ताशी  60 मैल वेगाने वारे वाहत आहे , बऱ्याच ठिकाणी झाडे  उन्मळून पडली आहेत अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागत आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे त्यामुळे अनेक कार रस्त्यातच बंद पडत आहे. काही राज्यात राज्यस्तरीय आणीबाणी जाहीर करण्यापर्यंत वेळ तेथील प्रशासनावर आली आहेतेथील प्रशासन लोकांना घरातच थांबण्