पोस्ट्स

एप्रिल १४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे नॉट आउट @170

इमेज
येत्या रविवारी 16तारखेला आपल्या सर्वांच्या भारतीय रेल्वेला 170 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा  ज्या तीन गोष्टींने  समस्त भारताला जोडुन ठेवले आहेत ,त्या म्हणजे बाँलीवूड, क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे विस्ताराच्या बाबतीत अजस्त्र आहेच,मात्र 21 शतकातील विकसीत भारताचे प्रतिनिधित्व करत आधुनिक देखील होत आहे, वंदे भारत एक्सप्रेस (जूने नाव ट्रेन18) हे त्याचे जिवंत उदाहरण .या खेरीज रेल्वेच्या वाहतूकीत मोठा वाटा असणाऱ्या प्रवाश्यांचा विचार करत भारतातील सर्व प्रवाशी गाड्यांना प्रवाश्यात कमी धक्के देणारे तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर एकमेकांवर न चढणाऱ्या (ज्यामुळे प्राणहानी टळते) अत्याधुनीक एल एच बी कोचेसची भेट देत तसेच भारतीयांना जलद प्रवाश्याची अनभुती येण्यासाठी सेमी हायस्पिड प्रकारची सेवा देण्यासाठी देखील तयारी करत हम है तयार हाच अनुभव भारतीयांना देण्यासाठी स्वतः तत्पर करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  वेगवेगळ्या18प्रकारच्या  प्रवाशी गाड्या( राजधानी , संपर्कक्रांती, दुरंतो, हमसफर, राज्यराणी व