पोस्ट्स

ऑगस्ट २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हत्या २३९ वर्षापुर्वीची

इमेज
       आजपासून २३९ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. स्थळ शनिवार वाडा पुणे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एका १८  वर्षीय तरुणाचा त्याचा काकांकडून मारेकरी घालवून हत्या केली जाते .   हीच  तो पेशवाईच्या इतिहासातील नारायण पेशव्यांची राघोबा दादाकडून करण्यात आलेली कुप्रसिद्ध हत्या . आज या इतिहासाला २३९ वर्षे पूर्ण झाली आहेत आजपासून २३९ वर्षांपूर्वी १७७३ ऑगस्ट ३० या दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली होती या निमित्याने ध चा मा करणे म्हणजे मूळ गोष्टीत  अनुचित प्रकारचा बदल   करणे   या अर्थी  वाक्यप्रचार रूढ झाली  पेशवाईच्या  इतिहासामुळे तीन म्हणी मराठी भाषेत रूढ झाल्या त्यातील एक म्हणजे ही होय अन्य दोन म्हणजे अटकेपार झेंडा रोवणे ही पराक्रमाची माहिती सांगण्यासाठी वापरण्यता येणारी म्हण तर दुसरी म्हणजे अपयशाचे वर्णन करणारी पानिपत होणे ही होय असो              पेशवाईच्या अंताची पायाभरणी या गोष्टीतून सुरु झाली असे मानले तर गैर ठरू नये कारण यामुळे अल्पकाळासाठी   मिळालेले पेशवेपद दीर्घकाळ टिकावे यासाठी राघोबादादांनी वसईच्या इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले ज्यामुळे चिमाजी अप्प्पा यांनी पाणी पाजलेल्या वसईच्या इंग्