पोस्ट्स

सप्टेंबर २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इराणच्या आंदोलांच्या मुळाशी

इमेज
    सध्या इराणमध्ये महिलांचे पारंपरिक बंधनाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरु आहे ज्यामध्ये हा मजकूर लिहण्यापर्यंत ३१ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे . तेथील सांस्कृतिक पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणीला   हिजाब नीट प्रकारे न घातल्याप्रकरणी   अटक केल्यावर पोलिसांच्या अत्याचारात सदर तरुणीचे निधन झाल्यावर हे आंदोलन सुरु झाले हे आंदोलन महिलांच्यावरील बंधनाबाबत आहे आजमितीस २०२२ साली हे आंदोलन सुरु असले तरी याची पायांमुळे १९७९ या जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वर्षापर्यंत मागे जातात याच वर्षी युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले ज्यामुळे तयार झालेला विविध घटनाक्रम आज देखील सुरु आहे तालिबानच्या रूपाने आज देखील आपण तो अनुभवत आहोतच याच १९७९ या वर्षी अजून एक घटना घडली ती म्हणजे इराण या देशात झालेली इस्लामिक क्रांती आज इराण मध्ये आपण जे बघतोय त्या घटनांशी मुळाशी असणारी घटना     इराणी क्रांती जरी ११ फेब्रुवारी १९७९ ला अधिकृतपणे सुरु  होऊन पुढे वर्षभर सुरु राहिली असली तरी या मागे मोठा इतिहास आहे  पहिल्या महायुद्धाच्या सुमारास इराणमध्ये पेट्रोलियम पदार्थ मोठ्या प्रमाणा