पोस्ट्स

डिसेंबर ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औपचारिकता बाकी (ब बुद्धिबळाचा भाग १८ वा )

इमेज
       बुद्धिबळाचा २०२१ चा विश्वविजेता हा विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन हाच होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे ८ डिसेंबर रोजी झालेल्या १० व्या डावानंतर मँग्नस कार्लसन याचे साडेसहा गुण झाले आहेत . तर विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या रशियाच्या इमाँन नोपाव्हची यांचे साडेपाच गुण झाले आहेत या स्पर्धेतील ४ सामने अद्याप बाकी आहेत . विश्वविजेत्यापदाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साडेसात गुणांची कमाई करण्यासाठी मँग्नस कार्लसन यांना एक डाव जिंकणे किंवा दोन डावात बरोबरी साधणे आवश्यक आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या इमाँन नोपाव्हची यांना पुढील सर्व डाव जिंकणे अत्यावश्यक आहे त्यांनी यातली कोणताही डाव  गमावला तर  गेल्या चार वर्षांपासून विश्वविजेते असणारे मँग्नस कार्लसन हेच पाचव्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेते होतील  जर पुढील एखादा डाव बरोबरीत सुटला आणि बाकीचे  तीन डाव  इमाँन नोपाव्हची यांनी जिकंले तर दोघांचे सात गुण होतील अश्या वेळेस दोघांत रॅपिड सामने खेळवण्यात येऊन त्यातील विजेता विश्वविजेता बनेल मात्र असे होण्याची खूपच कमी शक्यता आहे ऐतिहासिक म्हणून बुद्धिबळाच्या इतिहासात नोंद