पोस्ट्स

भूटान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताच्या सॉफ्ट पॉवरची गगनभरारी

इमेज
एखाद्या देशाच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे नाही तर सांस्कृतिक प्रभाव आणि अन्य मानवतावादी मदतीमुळे दुसऱ्या देशाचा प्रभाव जर एखाद्या देशावर असेल तर त्यास ज्या देशाचा प्रभाव आहे त्या देशाची ती सॉफ्ट पॉवर आहे असे संबोधतले जाते . जागतिक राजकारणात या सॉफ्ट पॉवरला अन्यन्य साधारण महत्व आहे ज्या गोष्टी लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे  शक्य होत नाही अश्या अनेक गोष्टी सॉफ्ट पॉवरमुळे विनासयास  साध्य होतात.  वसाहतवादाचे शिकार झालेल्या भारतासारख्या देशात दुसऱ्या वसाहतवादी देशात असणारे मूळ देशाचे नागरिक हि सुद्धा सॉफ्ट पॉवर असते जगभरातील सर्वच देश या सॉफ्ट पॉवरचा कमी अधिक वापर करतात . ज्यास भारत देखील अपवाद नाही आग्नेय आशियातील विविध देशांशी तसेच सार्क या संघटनेतील विविध देशांबरोबर  भारत याचा मोठ्या खुबीने वापर करतो  भारताच्या याच मालिकेतील नवा अध्याय २६ नोव्हेंबर रोजी लिहला गेला   आंध्रप्रदेश राज्यातील  सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण तळावरून  २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास एकूण ९ उपग्रह पी एस एल व्ही या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  पोलर सॅटे...

बातमीतील चीन (भाग 6)

इमेज
सध्या आपला महाराष्ट्र कोरोनाचा संकटाशी निकराचा लढा देत असताना आपल्या भारताच्या शेजारील चीन देशाबाबत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडत आहे.  ज्यामध्ये तूर्कस्थानच्या राजधानीत  अर्थात अंकारा शहरात असणाऱ्या चीनच्या दुतावासाच्या पाण्याचा पुरवठा अंकाराच्या महापौरांनी तोडणे, तसेच चीनने भूटान बरोबरच्या सीमाविवादात आंतीम तोडगा काढण्यासाठी बोलणी सुरु करण्याची तयारी करणे या घडामोडी महत्तवाचा आहेत.     तर मित्रांनो, चीनच्या अतिपश्चिमेकडे लडाखच्या उत्तरेला गिलगीट बाल्टीस्तानला लागून चीनचा सिंकीयांग (काही ठिकाणी याला झिंकीयांग असेही म्हणतात)हा प्रांत आहे. पुर्व तूर्कस्थान या नावाने सुद्धा प्रसिद्ध असलेल्या या प्रांतात मुस्लीम समाजबांधवांची संख्या प्रचंड आहे. वंशाचा, आणि भाषेचा  विचार करता येथील स्थानिक चीनपेक्षा तूर्कस्थानला अधिक जवळचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन येथील मुस्लिम बांधवांवर अत्याचार करत असल्याचा बातम्या सातत्याने येत आहे. ज्यामुळे तूर्कस्थानात या मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असणाऱ्या देशामध्ये जनमत चीन विरोधी आहे. सध्याचे सरकार चीनविरोधी उघड भूमिका घेत नसले तरी ...

भारत आणि बिमस्टेक2021

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येबाबत आपली महाराष्ट्रातील माध्यमे, मनात भिती उत्पन होवून त्या भितीपोटी मनोशाररीक विकाराद्वारा कोरोना होतो का ? असे वाटावे असे वार्तांकन करत असताना, 1एप्रिल रोजी ज्या संघटनेमध्ये भारत महत्तवाचा सदस्य देश आहे, अस्या बिमस्टेक या संघटनेतील मंत्री स्तरावरील परीषद आँनलाइन पद्धतीने झाली. ही या प्रकारची 17 वी परीषद होती. या परीषदेचे अध्यक्षपद श्रीलंकेकडे होते.     ज्यांचा बंगालचा उपसागराला किनारा लागून आहे, किंवा बंगालचा उपसागरासी जवळचा संपर्क आहे, अस्या सात देशांची संघटना म्हणजे बिमस्टेक . भारत ,श्रीलंका, नेपाळ, भुटान,बांगलादेश, म्यानमार ,थायलंड हे सदस्य देश असणाऱ्या या संघटनेची स्थापना एका जाहिरनाम्याद्वारे थायलंडची राजधानी बँकाक येथे 1997 साली झाली. बिमस्टेक हे या संघटनेचे संक्षीप्त रुप आहे, जीचे पुर्ण रुप आहे Bay of Bengal, intiative for mulut sectorial technological and economical cooperation  . या संस्थेचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली. सुरवातीला ही संघटना सहा उदिष्टांसाठी स्थापन झाली होती. त्याचामध्ये मोठ्या प्रमाणात...

भूतान मध्ये रंगणार नाट्य !

इमेज
          आपल्या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. काही घडामोडी राजकीय स्वरुपाच्या आहेत.तर काही घडामोडी मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत .  भूतान सारखे जागतिक राजकारणापासून कोसो मैल दुर राहणारे, भारताच्या संमतीशिवाय अन्य कोणाशी परराष्ट्रीय सबंध न ठेवणारे राष्ट्र देखील याला अपवाद ठरलेले नाही.              तर मित्रांनो, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करणाऱ्या दलातील सदस्य ब्रिगेडीयर थिनले  भूतान सर्वोच्च न्यायालयाचे  वरीष्ठ न्यायाधीश क्वीनले शेअरींग आणि एक साह्ययक न्यायाधीश येशव दोजी यांच्यावर राजघराण्याविरुद्ध आणि सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध षडयंत्र रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  त्यांनी भूतानच्या राजघराण्यातील धोका उत्पन होईल, असे वर्तन करणे, वशिलेबाजी, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या दलासाठी असणाऱ्या पैसाचा दुरापयोग करणे, तसेच अयोग्य पद्धतीने कर्जप्रकरण मंजूर करणे हे आरोप  ठेवण्यात आले आहे. सध्या शांततामय  तसेच आनंदीमय जीवनाची जगाला देणगी देण...

भारत भूतान मैत्री नव्या वळणावर

इमेज
              मित्रानो,आपला  भारत शेजारील देशांशी  नव्याने मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थपित करत आहे , हे आपण जाणताच . बांगलादेश मालदीव म्यानमार या देशांशी आपल्या भारताशी चीनचा प्रभाव असताना नव्याने निर्माण होणारे मैत्रीपूर्ण सबंध आपण या आधीच बघितले आहेत ते  ज्यांनी वाचले नसतील त्यांच्यासाठी या लेखाच्या शेवटी त्यांचा लिंक दिलेल्या आहेत . त्या ठिकाणी जाऊन आपण ते वाचू शकतात या लेखात मी बोलणार आहे ते भूतान या देशाविषयी                   भूतान हा  भारत आणि चीन या दोन महासत्ताच्या मधोमध असणारे हिमालयाच्या कुशीतील एक बफर  देश आहे . भारताच्या शेजारील देशांमध्ये घटनादत्त राजेशाही असणारा हा एकमेव देश आहे . .प्रजेची मागणी नसताना शांततेने आपले अधिकार कमी करता जनतेला लोकशाही मार्गावर नेणारा राजा म्हणून भूतानच्या राजाची ओळख आहे . एकीकडे सर्व जग जीडीपी च्या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजत असताना देशातील लोक किती आनंदी आहे , या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजण्याची शिकवण जगाला देणारा देश म्हणजे ...