पोस्ट्स

पर्यावरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नेमीची  येते अवकाळी 

इमेज
  मी हा मजकूर लिहीत असताना पुणे शहर परिसरात अवकाळी पावसामूळे नागरिक धास्तावले आहेत. २ एप्रिल रोजी दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे परिसरात एका मराठी वाक्यप्रचाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे तो म्हणजे ' नेमीची  येते अवकाळी'   नेमेची येतो पावसाळा या मराठी वाक्यप्रचारात  पावसाळी  या शब्दाचा जागी अवकाळी हा शब्द बदल करत  ही चर्चा रंगली आहे  तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५  वर्षाचा आढावा घेतला तर या वर्षात मार्च  ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हेचक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच .तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील तर पुढच्या वेळी तुम्ही  फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.  मात्र असे असले तरी  देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे आपणांस ...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने -

इमेज
सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो    ही या मागची कल्पना आहे .   मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे   वृक्षांचे महत्व   आपण अनूभवू पण शकतो       उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया   पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते   पुणे अधिक प्रमाणात   ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो   . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्...

जोशीमठाच्या आपत्तीतून आपण घ्यावयाचे धडे

इमेज
                   उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या शहरात भौगोलिक स्थितीमुळे झालेली आणीबाणीची स्थिती ऐव्हाना आपणास मोठ्या प्रमाणात माहिती झालेली असेल.विविध भुगर्भ शास्त्रज्ञांनी या आधी दिलेले सुरक्षेतेचे इशारे देखील आपणास माध्यमांमार्फत आपणास ठाउक असतील जोशीमठ येथील संकट भयानक आहेच ,यात शंकाच नाही. मात्र पुर्णतः जोशीमठ सारखेच नाही मात्र त्याच तीव्रतेचे संकट आपल्या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे कोकणाचे .              कोकणचे भुगर्भ अत्यंत सुरक्षीत असले तरी  सयुंक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय संघटनेने कोकणच्या  पर्यावरणाचा समावेश पृथ्वीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरणात करण्यात केला आहे. कोकणात मोठे प्रकल्प नको असा अहवाल माधवराव चितळे आणि गाडगीळ समितीमार्फत आधीच देण्यात आला आहे. तरीदेखील काही प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकली तर आश्चर्य वाटायला नको. उत्तराखंड राज्यात देखील या आधी देण्यात आलेले सुरक्षीतचे नियम पायदळी तूडवल्याचे परीणाम आपण बघत आहोतच. तोच धोका ...

पर्यावरणपुरक गणपती उत्सव

इमेज
   निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत...

रशिया युक्रेन युद्धाच्या अप्रकाशीत बाजू

इमेज
              रशियाने युक्रेनवर केलेल्या गोष्टीला आता १०० दिवस झाले आहेत अजूनही युद्ध संपले नाहीये युद्ध कधी संपेल हे आताच सांगणे अवघड आहे युद्धाच्या शेवट कसा होणार कधी होणार याबाबत अनिश्चितता असली तरी त्यांचे परिणाम आता दिसत आहे जगात अन्नधान्याचे भाव प्रचंड वाढले आहेत गव्हाची प्रचंड टंचाई झाली आहे नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण बऱ्याच मोठ्या प्रमाणत आखाती मध्यपूर्व देशांकडे गेले आहे (पूर्वी जागचे नियंत्रण मोठ्या प्रमाणत युरोप खंडातील देशांकडून होत असल्याने आणि त्यांच्यासाठी सदर प्रदेश पूर्वदिशेच्या मध्यभागी असल्याने त्यास ते मध्यपूर्व म्हणत त्यानंतर  त्याला तेच नाव पडले त्यामुळे आपल्या पश्चिमेला असून देखील आपण तेच म्हणतो असो ) ज्याची परिणीती नैसर्गिक इंधनाचे दर वाढण्यात होत आहे (एखाद्या गोष्टीबाबत एकाधिकारशाही झाल्यास दुसरे काय होणार ) मी वर सांगितलेल्या बाबींवर या आधी माध्यमातून सांगण्यात आले आहेत हे बदल आपण अनुभवत सुद्धा आहोत मात्र युद्धाचे फक्त इतकेच परिणाम नाहीये किंबहुना हे परिणाम म्हणजे फुटकळ चणे फुटाणे वाटावे असे संकट येणार आहे ज्याच...

मानावा सावध हो पुढल्या हाका

इमेज
             शाहरुख खान आणि आणि काजोल यांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणजे माय नेम इज खान . या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यावर चित्रित एक गाणे आहे . तेरे नैना तेरे नैना रे . या गाण्यात एक दृश्यात शाहरुख खानने  काजोलला  मधमाश्यांचे  निसर्गातील महत्व  सांगितले आहे ज्यात अल्बर्ट आईंस्टानच्या  हवाल्याने जर जगातील सर्व मधमाश्या नष्ट झाल्यावर चार वर्षांनी जगातील सर्व माणसे मरतील अशी भविष्यवाणी शाहरुखने केली आहे . आता असे  काही  अल्बर्ट आईंस्टान खरंच म्हंटले की शाहरुख खानाने चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याच्या तोंडी स्वतःहून घातलेले वाक्य आहे हे तो शाहरुख खानच जाणे .मात्र जगातील पक्षी जगत धोक्यात आहे हे नुकतेच एका संशोधांतून स्पष्ट झाले आहे                स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स या पक्ष्यांच्या संरक्षणविषयक कार्य करणाऱ्या संस्थेनुसार  जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यच्या 10,994  जातींपैकी  13.5%  जातींवर  सध्या नामशेष होण्याचा धोका आहे गुवाहाटी येथील जंगलात ...

हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार ?

इमेज
         हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार का  ? , असा प्रश्न उपस्थित व्हावा असे निष्कर्ष  नुकतेच अमेरिका आणि युकेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधकांतून समोर आलेले आहेत अमेरिकेतील सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीच्या डॉ क्लो गुस्टाफसन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे शोध लावले. या संशोधनासाठी या गटाने वापरलेल्या  तंत्राला मॅग्नेटोटेल्युरिक्स म्हणतात . हे खडक , गाळ , बर्फ किंवा पाणी असो , खोलवर दफन केलेल्या पदार्थांचे गुणधर्म निर्धारित करण्यासाठी पृथ्वीच्या नैसर्गिक विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांमधील फरकांची नोंद करते .               या संशोधकांना  अंटार्क्टिका खंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या एका हिमनदीवर  संशोधन करत असताना  व्हिलन्स आइस स्ट्रीमच्या खाली  काही शेकडो मीटर अंतरावर द्रव तरल स्वरूपातील  पाणी आढळले आहे    अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या प्रवाहाखाली भूजल सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंटार्क्टिका हवामान बदलावर कशी प्रतिक्रिया द...

आपली गोदावरी वाचावा ...

इमेज
              नाशिकचे भूषण असणारी  गोदावरी नदी  वाचवण्याची गरज असल्याचे बुधवार १६ फेब्रुवारी रोजी हरित लवादाने दिलेल्या निकालामुळे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आपल्या निवाड्यात हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यास आणि अंघोळ करण्यास लायक नसल्याचे स्पष्ट केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पंच्या दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण हरित लवादाने आपल्या निकालात  नोंदवले आहे  राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने या बाबत भाष्य करताना सांगितले की नाशिक आणि त्रंबकेश्वर या शहरात  दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते.जे अत्यंत चिंताजनक  असून या सांडपाण्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यास सोडा अंघोळीस देखील लायक नाही मात्र तरी देखील लोक ते वापरत आहेत जे वाईट आहे या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने राज्य आणि स्थानिक प्...

वन्यजीव मानव संघर्ष अटळ

इमेज
            वन्यजीव मानव संघर्ष अटळ  आहे ,याची साक्ष देणारी घटनासोमवार ३१ जानेवारी रोजी नाशिककरांनी अनुभवली .नाशिकच्या  नाशिकरोड या उपनगरातील जयभवानी रोड परिसरातील नागरिकांना तब्ब्ल ७ तास बिबटयांनी अक्षरशः दशतीतीत ठेवले  . सोमवारी घडलेला प्रसंग काही नवीन नाही  तसे नाशिकच्या नाशिकरोड परिसर मखमलाबाद परिसर गंगापूर रोड परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे अनेक प्रसंग यापूर्वी देखील घडले आहेत  मात्र गेल्या काही दिवसाचा विचार करता त्याची वारंवारता प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचेच दुःख आहे . गेल्या काही दिवसात या प्रकारच्या घटनांमध्ये आणि जंगली श्वापद पकडण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी वन खात्याला करावे लागणारे परीक्षम बघता येत्या काळात मानव आणि जंगली प्राणी यांच्यात संघर्ष पेटला तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती आहे        मानवाचे जंगलावर होणारे आक्रमण , मानवाच्याच  कृतीमुळे वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या , असणाऱ्या वन क्षेत्रात कमी झालेली तृणभक्षक प्प्राण्याची संख्या यामुळे गेल्या काही वर्षात वन्यजीव म...

पर्यावरणप्रेमींचा हाती जर्मनीचे सुकाणू

इमेज
             गेल्या रविवारी 26 सप्टेंबर रोजी जर्मनीच्या केंद्रीय विधीमंडळाच्या (सोप्या भाषेत लोकसभेच्या) निवडणूका झाला. त्या निवडणूकीमध्ये सत्तारुढ खिश्चन डेमोक्रेटिक युनियन (  CDU), आणि खिश्चन सोशालिस्ट युनियन ( CSU ) या पक्षांचा युतीचा  पराभव झाला. मागील 2017 साली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या मतांपेक्षा  त्यांना यावेळी 8.7टक्के मते कमी मिळाली. ते 24.1टक्के मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सोशल डेमोक्रेटीक युनियन (SDP) या पक्षाला 25.6 टक्के मते मिळाली आहेत.   तर पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या ग्रीन पार्टीस आतापर्यतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यांना 14.8टक्के मते मिळाली आहे. सत्तारुढ  पक्षांनी आपली हार स्विकारली आहे. तेथील कोणत्याच पक्षाला पुरेसे मत्ताधिक्य नसल्याने, सोशल डेमोक्रेटीक पक्षाच्या नेर्तृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात येत आहे.ज्यामध्ये ग्रीन पार्टी मोठी भुमिका बजावणार असल्याचे डि डब्ल्यु , या जर्मन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीसह फ्र...

वन्यसंपदा धोक्यात !

इमेज
               आपल्याकडे विविध राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या देण्यात  माध्यमे रंगून गेलेली असताना, जागतिक स्तराच्या विचार करता वन्यसंपदा धोक्यत असल्याचा दोन बातम्या मला बीबीसी बघतांना आढळल्या . बीबीसीच्या बातम्यांचा सूर  काहीसा भारतविरोधी आणि पाकिस्तानला साह्य करणारा असला तरी   (याचमुळे अनेकजण बीबीसीचे पूर्ण स्वरूप ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कंपनी च्या ऐवजी बुलशीट ब्रॉडकॉस्टिंग कंपनी असा अपरोधिक करतात ) तरी विज्ञान विषयक त्यांचे वार्तांकन खूपच सोप्या मात्र माहितीपूर्ण भाषेत असल्याने मी बीबीसी नेहमीच बघतो असो               तर सांगायचं मुद्दा असा की, जर आताच काही कार्यवाही ना केल्यास   ऑस्ट्रोलीय या देशातील 26 प्रकारच्या बेडकाच्या जाती 2040 पर्यंत पूर्णतः नष्ट  होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली  ऑस्ट्रोलीय या देशात एकूण 240 प्रकारच्या बेडकाच्या जाती अढळतात असत त्यातील चार प्रकारच्या बेडकाच्या जाती या आधीच नष्ट झालेल्या आहेत तर  26 प्रकारच्य...

बातमीतील श्रीलंका

इमेज
      श्रीलंका आपल्या भारताच्या दक्षीणेला असणारे एक बेट स्वरुप राष्ट्र , जे भारत स्वतंत्र झाल्यावर एका वर्षाने स्वतंत्र्य झाले. आपल्या रामायण या महाकाव्यात उल्लेख असणारे राष्ट्र , नैसर्गिस सृष्टीसौंदर्याने भरभरून राहिलेले राष्ट्र म्हणजे श्रीलंका . तर हा श्रीलंका हा देश गेल्या पंधरवाड्यात तीनदा विविध कारणांमुळे चर्चेत आला. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशाने श्रीलंका या देशाला दिलेले साँफ्ट लोन  , दिसरी घडामोडी म्हणजे श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला झालेला अपघात आणि त्यामुळे श्रीलंकेच्या पर्यावरणावर झालेला अनिष्ट परीणाम . तर तिसरी घटना म्हणजे श्रीलंकेने स्पेशल इकाँनाँमिकल झोन उभारताना चीनला दिलेल्या अवास्तव परवानग्या .          आता बघूया या सर्व घडामोडी क्रमाक्रमाने प्रथम बांगलादेशाने श्रीलंकेला दिलेले साँफ्ट लोन. श्रीलंकेकडे आजमितीस फक्त 4 दशलक्ष इतकेच परकीय चलन आहे. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार करण्यासाठी अधिक परकीय गंजाजळीची आवश्यकता आहे. ती पुर्ण करण्यासाठी बांगलादेश श्रीलंकेला 200 दशलक्ष डाँलरची मदत करणार आ...

हा विक्रम अभिमानास्पद नाही !

इमेज
                सध्या भारतीय करोनाच्या धास्तीत जगत असताना त्याही पेक्षा धक्कादायक बातमी नुकतीच भारतीय हवामान खात्यामार्फत जाहिर करण्यात आली . जेव्हापासून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली, त्यापासूनच्या आतापर्यतचा विचार केला असता जमू काश्मीर  या केंद्रशासित प्रदेशमधील कुपवारा  येथे आँगस्ट महिन्यातील सर्वाधिक 17 आँगस्ट रोजी  तापमान नोंदवले गेले , तसेच प्रमाणे श्रीनगर येथे देखील गेल्या 39 वर्षातील सर्वाधिक तापमान  नोंदवले गेले आहे.अशी ती बातमी होती .सध्याच्या हवामान बदलाच्या काळात या बातमीला विशेष महत्त्व आहे .                 गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण हवामानात होणारे बदल तिव्रतेने अनुभवत आहोत . नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात पडणारा पाउस , हिवाळ्यात पडणारी असाह्य थंडी, उन्हाळ्यात नोंदवलेले जाणारे प्रचंड तापमान, पावसाची येण्याची तारीख उशीरा होणे , कमी वेळात जास्त पाउस पडण्याचा प्रसंगामध्ये वाढ होणे यासारखे बदल आपण अनुभवत आहोत . मात्र या बदलांना सामोरे जाताना ज्या गतीन...

पर्यावरणाबाबत आपण जागृत कधी होणार ?

इमेज
               मित्रांनो, आपल्या भारतातील देशपातळीवरील  इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्या सुशांतसिंग राजपुत यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांबरोबर स्वतःचा स्वतंत्र अस्या तपासात मग्न असताना, आपल्या देशावर भविष्यात  दुरगामी परीणाम करतील अस्या दोन.घटना जगात घडत आहे, माझे आजचे लेखन त्यासाठी                   तर मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरीका या देशातील कँलिफोर्निया या राज्यात प्रचंड असा वणवा लागलेला आहे . आजमितीस तो वणवा कँलिफोर्निया या राज्यचा शेजारील नेवाडा या राज्यात देखील पसरला आहे . मित्रांनो कँफिलोर्निया या राज्यातील जंगले उत्तर अमेरीका खंडातील प्रमुख जंगले आहेत, आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातील प्रमुख जंगलात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे . काही महिन्यांपुर्वी दक्षीण अमेरीकेतील अँमेझाँनच्या जंगलामध्ये वणवा लागलेला होता, तो शांत होतोच न होतो तोच आँस्टोलिया या देशात वणवा लागला . आँस्टोलिया येथील वणव्यामधून मानव उशांत घेत असताना सबैरीया येथे वणवा लागला .तो धुमसत असतानाच आता...

बिबट्याच्या शहरात वावर आणि हत्तीणीच्या मृत्यू

इमेज
               गेल्या आठवड्याभरात दोनदा प्राणिजीवन आणि मानवीजीवन यातील संघर्ष पाहण्यात आला . पहिला संघर्ष बघितला तो नाशिक या शहरातील भर लोकवस्तीत असणारा  बिबट्यांचा वावर  आणि दुसरा अर्थात केरळमधील हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू . यातील हत्तीणीचा मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे . यातील दोषींना योग्य ते शासन झालेच पाहिजे , यात शंका नाही . मात्र या दोन्ही घटनांकडे बघताना एका सामाईक गोष्टींकडे दुर्लक्षून चालणार नाही , आणि तो म्हणजे प्राणीजीवनाचा मानवी वस्तीतील शिरकाव .                                 वाढत्या लोकसंख्येमुळे घटणारे वनक्षेत्र,  त्यामुळे अन्नाच्या शोधात वन्यजीवांचे  मानवी वस्तीत  येणे,  आणि वन्यजीवांतील तृणभक्षक प्राण्यांनी  शेतीची नासधूस करणे , तसेच मांसभक्षक प्राण्यांनी पाळीव जनावरे नष्ट करणे . याला अटकाव करण्यासाठी मानवांनी केलेल्या उपाययोजनेत वन्यजीवांचा मृत्य होणे या बाबींचा विचार या निमित्याने करावा लागतो .केरळमधील ...

विलुप्त होणाऱ्या गेंड्याच्या प्रजातीविषयी थोडेसे

इमेज
                 सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, पृथ्वीच्या जैवविविधेतेवरचे संकट म्हणता येईल , अशी घटना 23 नोव्हेंबर 2019 ला  मलेशिया या देशात घडली . मात्र आपल्या भारतीय माध्यमात या विषयी फारसे काही चर्चिले गेले नाही . तर चला मित्रानो माहिती करून घेउया या घटनेविषयी   मित्रांनो , सर्वात वजनदार  शाकाहारी प्राण्यांपैकी एक म्हणून   म्हणून  ज्या  प्राण्यांकडे बघितले जाते , तो म्हणजे गेंडा . या गेंड्याच्या एका प्रजातीविषयीच आजचा लेख आहे . तर, जगभरात गेंड्याच्या 5  प्रजाती आढळतात . त्यामध्ये आकाराने सर्वात लहान म्हणून ओळखली जाणारी प्रजाती म्हणजे सुमात्रीयन गेंडा . जो फक्त इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात आढळतो . ( खरेतर या देशाच्या यादीतून मलेशिया आता वगळायला हवे ) युनोस्कोच्या  अत्यंत धोकादायक स्थितीत असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत या प्रजातीच्या गेंड्याचा फार  वरचा क्रमांक ...

नितीवाल्या लोकांची अनिती .

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाउस . मराठवाड्यात  काहीच पाऊस नसल्याने आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्याने हाहाकार माजला आहे . एकाच राज्यातील ही दोन शहरे मात्र अत्यंत विरोधी हवामान दाखवत आहे  याला कारणीभूत आहे . सध्याचे अत्यंत जलद गतीने बदलणारे हवामान ,  आणि या  प्रकाशाच्या वेगाला लाजवेल अश्या  पद्धतीने बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे . जगाला सर्वत्र नीतिमत्तेचे धडे देणारा मात्र स्वतः मात्र अत्यंत अनीतीने वागणारा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका .      . जगातील सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करून पर्यावरणाची हानी करणारा हा देश .इतरांनी त्यातही प्रामुख्याने आपल्या भारताने आणि चीनने नैसर्गिक साधन संपत्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सल्ला देणारा हा देश . स्वतःची आर्थिक प्रगती झाली आहे . ही प्रगती करताना आपण प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची वाट लावली आहे . आता इतर देशांना प्रगतीची संधी देताना स्वतःच्या नैसर्गिक साधसनसंपत्तीच्या उधळपट्टीला लगाम न  घाल...