पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवा आता तरी जागा हो !

इमेज
                          मी अनेकदा चँनेल न्युज एशिया , एन एच के वर्ल्ड , सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन    नविन माहिती मिळाल्या  .त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातम्या  शोधण्याचा प्रयत्न केला असता , ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी . या  बातमीच्या  लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत  दोन्ही बातम्या हवामान बदल या विषयाशी संबधित आहेत . तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट म्हणून सर्वाना परिचित असणाऱ्या ग्रीनलँड या बेटावरील बर्फ वितळण्याचा वेगाचा नवा उच्चांक झाल्यासंबंधी ती बातमी होती . बातमीत सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात  बर्फ वितळण्याचा वेग कमी झालेला असताना सन 2019 या वर्षी हा बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढल्याचे एका बातमीत सांगण्यात आले आहे . तर दुसऱ्या बातमीनुसार वाढत्या तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांचा शेतीचे उत्पादन करताना येणाऱ्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते . याच बातमीच्या प