पोस्ट्स

सप्टेंबर १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेगाने विनाशाकडे !,

इमेज
             मार्वो ,लॉरा,सँली ही नावे आहेत , गेल्या बारा दिवसात अमेरीका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळांची . आँगस्ट महिन्यातील शेवटचा पंधरवाडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात एक या हिशोबाने दक्षिण कोरीया प्रदेशात आलेल्या चक्रीवादळातून मानवजात सावरत असतानाच पुन्हा एकदा मानवजातीने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचा प्रतिकार म्हणून निसर्ग काय करु शकतो, याची झलक म्हणून या चक्रीवादळांकडे बघू शकतो .                             अमेरीकेत आलेली , मार्को, लाँरा, सँली सारखी चक्रीवादळे असो अथवा त्या आधी दक्षीण कोरीया प्रदेशात आलेली हैसेन, बावी, मायसर्क  ही चक्रीवादळे अधिक धोकादायक या श्रेणीमध्ये मोडणारी होती . मानवाने आपले सर्व मतभेद विसरुन पर्यावरणाचा प्रश्नावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सुचित करणारी ही चक्रीवादळे जरी अमेरीका आणि दक्षीण कोरीया या भारतापासून दुर असणाऱ्या प्रदेशात झाली आहेत, आपणाला काही घाबरण्याचे कारण नाही, असे याबाबत म्हणून चालणार नाही, आज आपण सुपात आणि ते जात्यात असले तरी यापुढील क्रमांक आपला आहे,  हे विसरुन चालणार नाही . आपण त्या दृष्टीने

आखाती देशातील राजकारण नव्या वळणावर

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या मृत्यूबाबत नको एव्हढ्या तपशीलात वार्तांकन करत असताना, जगातील स्फोटक प्रदेशांपैकी एक असणाऱ्या आखाती देशात काहीसे सकारात्मक राजकारण घडत आहे. दुर्देवाने जगाच्या राजकाराला प्रचंड प्रमाणात बदलणाऱ्या या घटनेविषयी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये फारच कमी माहिती देण्यात येत आहे . ती उणीव भरुन काढण्यासाठी आजचे लेखन.                   तर मित्रांनो, जे आखाती देश  एकेकाळी आम्ही गवत खावून जगू, मात्र इस्राइलचे अस्तिव या पृथ्वीवरुन नष्ट करु, अशी वल्गना करायचे,  आपली एकत्र मोट बांधून 1948,1956, तसेच 1967 असे तिनदा ज्या  राष्ट्राला बेचिराख करण्यासाठी युद्ध केले, त्या इस्राइलबरोबर आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित करत आहेत . हा मजकूर लिहित असताना (16 सप्टेंबर 2020) गेल्या दोन महिन्यात इस्राईलबरोबर युनाटेड अरब अमिरात (UAE),जाँडन आणि बहारीन या देशांनी आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित केले आहेत . इजिप्त या देशाने या आधीच आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित केले आहेत, त्या अर्थाने चार आखाती देशाने इस्राइलला मान्यता दिली आहे.                     गे