पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

इमेज
 20 ऑगस्ट 1944 हि निव्वळ तारीख नाहीये . ही तारीख आहे आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या  देशाला कित्येक वर्ष पुढे घेऊन जाणाऱ्या  एका कणखर पंतप्रधानाची.   राजीव गांधी  हे त्या पंतप्रधानाचे नाव . आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की  दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस मी असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडणे यात काही वावगे असे काही नाही . जगभरात असेच झाले आहे . भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या आफ्रिकी आणि आशियाई देशांच्या लोकशाहीची वाटचाल आपल्या भारताच्या लोकशाही सारखीच झाली आहे . असो  राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड असलेल्या धाकट्या भावाचे अपघाती निधन झा