पोस्ट्स

एप्रिल ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची

इमेज
                      "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्ती"  किंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर त्यांच्या रविवारी होणाऱ्या  पुस्तकविषयक कार्यक्रमात याचा उल्लेख करण्यात आला होता , हे आपल्यापैकी अनेकांना स्म