पोस्ट्स

एप्रिल १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यांच्या अनुभवातून आपण शहाणे होणार का ?

इमेज
           सध्या आपल्याकडे विविध राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु असताना जगभरातील अनेक देश एका वेगळ्याच संकटाला तोंड देत आहेत ते संकट म्हणजे प्रचंड  अश्या पावसाचे.  १३ एप्रिल पर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार त्यांच्या आधी  तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे १३ एप्रिल पर्यंत दक्षिण आफ्रिकेत ६० लोक तर फिलिपाइन्स या देशात ४५ लोक मृत्युमुखी पडले आहेत . फिलिपाइन्स मध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लोक पावसामुळे दरड कोसळून प्राणास मुकले आहेत . दक्षिण आफ्रिका हा देश भारताच्या तुलनेत विकसित समजला जातो मात्र त्या ठिकाणी देखील कोसळलेल्या पावसामुळे डर्बन या शहराच्या उत्तरेकडच्या भागात मोठं मोठे चिखलाचे पूर येऊन प्रचंड  प्रमाणात वितहानी झालीआहे . दक्षिण आफ्रिका आणि फिलिपाइन्स या देशात अनेक महामार्ग पावसामुळे वापरण्याजोगे राहिलेले नाही तेथिल लोक मूलभूत जीवनावश्यक गोष्टींपासून देखील दूर आहेत दक्षिण आफ्रिकेत या पावसामुळे ६० लोक जीवास मुकले आहेत फिलिपाइन्स देशाच्या हवामान खात्यावर या काळात देशात पाऊस पडणे यात फारसे वावगे नसले तरी तो ज्या प्रमाणत क