पोस्ट्स

एप्रिल १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनच्या प्रगतीची कुळकथा सांगणारे पुस्तक "चिनी महासतेचा उदय - डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग"

इमेज
      चीन,भारता  इतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश , भारताच्या महासत्ता पडला अडथळा ठरणारा देश , भारताबरोबर सीमावाद असणारा आणि त्या वादाला वेळोवेळी ताजे करणारा देश म्हणजे चीन भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानसह भारताच्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी धडपडणारा देश म्हणजे चीन भारताबरोबर शांघाय को ऑपरेशन हे संघटन तसेच  ब्रिक्स संघटना  आदी विविध आंतराष्ट्रीय व्यासपीठवरील सहकारी.   स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यात ज्या २ देशांचा उल्लेखहे देश  निद्रिस्त ड्रॅगन  आहेत आणि हे  ड्रॅगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवेल असा केला होता त्यापैकी एक देश म्हणजे चीन  (दुसरा देश जपान ) स्वामी विवेकानंद यांनी निद्रिस्त ड्रॅगन म्हणून उल्लेल्ख केलेला चीन हा खरोखर १९७८ पासून जागा झाला आणि तो आता खरोखर जगाची झोप उडवत आहे या दरम्यानचा त्याचा प्रवास सांगणारे पुस्तक म्हणजे निवृत्तीनंतर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले सनदी अधिकारी सतीश बंगाल यांनी लिहलेले आणि साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तक  "चिनी महासतेचा उदय - डेंग  झिओपेंग ते क्षी जिनपिंग"