पोस्ट्स

एप्रिल ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओळख एका रत्नाची

इमेज
                                आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास  आलेल्या आहेत ,  वहिदा   रेहमान त्यापैकीच एक  मूळच्या  तेलगू भाषिक  असणाऱ्या या मुस्लिम  धर्मीय अभिनेत्रीने आपल्या सहज सध्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ गाजवून टाकला . गाईड , प्यासा सारखे  अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले . सुरवातीच्या काळात तेलगू भाषेतील चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीने अनेक पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत .त्यापैकीच एक म्हणजे नसरीन मुन्नी कबीर  यांना. वहिदा रेहमान यांनी दिलेली मुलाखत ..नसरीन मुन्नी कबीर  यांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे . मुळची इंग्रजीत असलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीचे मराठीतील ज्येष्ठ सिने पत्रकार, आणि आघाडीचे अनुवादक मिलींद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनामार्फत प्रकाशीत करण्यात आले आहे.                             सदर पुस्तकात मुळ लेखीकेमार्फत डिसेंबर 2012 ते नोव्हेंबर 2013 या अकरा महिन्याचा कालावधीत सुमारे दोन तासाची एक भेट या हिशोबाने पंचवीस भेटीमध