पोस्ट्स

सप्टेंबर ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या भारतीय खेळाडूंना शाबासकीची थाप कधी ?

इमेज
    आपल्या भारतात खेळ म्हंटले की साधारणतः मैदानी खेळच समजले जातात . मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचाच गौरव करण्यात येतो   ज्यामुळे बुद्धिबळासारखा अस्सल भारतीय भूमीतील शारीरिक क्षमता आणि बौद्धिक चातुर्य यांच्या अनोखा संगम असलेला खेळ   खेळत असणाऱ्या खेळाडूंवर काहीसा अन्याय होतो . निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हा वाक्यप्रचार आपण सर्वांना माहिती आहेच आता निरोगी शरीररसाठी शारीरिक तंदरुस्ती हवीच ना ? बुद्धिबळ खेळताना बुद्धिबळाचा सराव करताना सातत्याने बसून वजन वाढते आणि या वाढलेल्या वजनामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर काहीसा विपरीत परिणाम होतो त्यामुळे बुद्धिबळपटूंना खेळाच्या सरावाबरोबर शारीरिक व्यायाम देखील करावा लागतो . तासंतास एका जागी चित्त स्थिर करणे यासाठी   पाठ आणि मान शारीरिक दृष्ट्या योग्य असावीच लागते पाठ आणि मान योग्य राहण्यासाठी बुद्धिबळपटूंना शारीरिक तंदरुस्ती राखावीच लागते . असा रीतीने खेळासाठी दुहेरी मेहनत घेऊन सुद्धा आपल्याकडे बुद्धिबळपटूंना योग्य तो सम्मान

आत्महत्या :एक सामाजिक शाप

इमेज
   नुकताच राष्ट्रीय गुन्हे अहवाल प्रसिद्ध झाला. यात भारतात आत्यहत्येविषयी अत्यंत विदारक परीस्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या 2021साली देशात 1 लाख 60हजार जणांनी आत्महत्या केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या दिड लाखाहुन अधिक आत्महत्येत 13हजार 89 आत्महत्या या विद्यार्थ्यांचा आहेत.एका वर्षात 13हजार आत्महत्या म्हणजे दर 40 मिनीटांनी एक आत्महत्या. ज्या विद्यार्थ्यांचा आशेवर आपण उद्याचे महासत्तेचे स्वप्न बघतो त्या विद्यार्थ्यांना दर 40मिनीटांनी आत्महत्या करण्यासारखी स्थिती असेल तर आपले महासत्तेचे स्वप्न धुळीस तर मिळणार नाही ना?असी शंका उत्पन होवू शकतो.  .आता या आत्महत्या विषयावर माझ्या आधी इतक्या लोकांनी बोलले आहे, लिहले आहे, की बस.त्यामुळे मी त्यावर नविन काय सांगणार पामर ? याची कारणे आणि त्यावरच्या उपाययोजना सर्वांना माहिती आहेच. मात्र  "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे"या वाक्यप्रचारानुसार या आधी यावर काहीच कृती कार्यक्रम का आखण्यात आला नाही? या प्रश्नावर मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे  थ्री इडीयट सारखा एखादा चित्रपट आल्यावर  विद्यार्थ्यांचा आत्महत्येवर वृत