पोस्ट्स

जुलै १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

17 जूलैनंतर पाकिस्तानात काय होणार ?

इमेज
    आपल्या भारताच्या दक्षिणदिशेला असणाऱ्या श्रीलंकेच्या  आर्थिक आणि राजकीय समस्येबाबत आपणास आतापर्यंत बरेच काहि माहिती झाले असेल.मात्र हे कमी की काय म्हणून भारताच्या पश्चिमेकडेसुद्धा एक मोठे राजकीय संकट तयार होत आहे. हे संकट आहे, पाकिस्तानमधील.      पाकिस्तानमध्ये दोन राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातील एक आहे, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात. तर दुसरी घडामोड आहे, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांनी संसद भंग करण्याचा निर्णयावर दिलेला निर्णय.          तर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार जावून शहबाज शरीफ यांचे सरकार आल्यावर त्याचे प्रतीसाद त्यांचा पंजाबच्या विधानसभेत देखील उमटले. तिथे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यावर अविश्वाचा प्रस्ताव दाखल करण्यात येवून त्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यावेळी पंतप्रधानाच्या मुलाने अर्थात हमजा शहबाज शरीफ याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  या सर्व नाट्यामध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 20 आमदारांना अपात्र ठरवले.त्यामुळे विधानसभेच्या बहुमतासाठी 186 जागा आवश्यक असताना सत्तारुढ पक्षाकडे 177 आमदरांचे बहु