पोस्ट्स

फेब्रुवारी १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर

इमेज
                 जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाहीना असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या रशिया आणि युक्रेनबाबत घडत आहेत सध्याचा रशिया आणि भूतपूर्व युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणाऱ्या मात्र १९९१ पासून स्वतंत्र देश असलेल्या युक्रेन यांच्या सीमेवर रशियाने मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे युक्रेनला कोणत्याही स्थितीत अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन चा सदस्य होऊ देणार नाही प्रसंगी वेळ पडल्यास युक्रेनवर आक्रमण देखील करू अशी रशियाची भूमिका आहे नाटो या संक्षिप्त नावाने परिचित असणारी  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी हितसंबंध जपणारी संघटना शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या पुढाकाराने  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाची लष्करी सहयोग संघटना सीटोचा प्रभाव कमी करण्यासाठी झाली होती  काही दिवसापूर्वीच रशियाचे काहीसे  हुकूमशहा पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विसर्जन होऊन ३० वर्षे झाली म्हणून आयोजित कार्यक्रमात युएसएसरचे विसर्जन ही २० व्या शतकातील सर्वात मोठी घोडचूक असल्