पोस्ट्स

ऑक्टोबर १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोने विचाराचे ...

इमेज
          विजयादशमी अर्थात दसरा भारतीय पंरंपरेतील शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त . या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोनेरूपी देऊन एकमेकांचे सुयश चिंतण्याची प्रथा आहे उत्तर भारतात  निमित्याने गेली ९ दिवस सुरु असणाऱ्या रामकथेचा शेवट रावणदहनाने करण्याची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार करता या दिवशी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे . एक म्हणजे मुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणारे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेला असणारे संबोधन आणि दुसरे म्हणजे नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालकांचे संघाच्या स्वयंसेवकाला संबोधित करून होणारे  होणारे संबोधन . बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुत्र आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हहे त्यांच्या वतीने जनतेला संबोधित करतात . या दोन्ही भाषणांना आपल्या महाराष्ट्रात विचारांचे सोने म्हणण्याची परंपरा आहे . स्वयंसेवकांना उद्देशून असणारे संबोधन हे सकाळी असते तर शिवसेना प्रमुखांचे संबोधन सायंकाळी असते दोन्ही संघटनांची भावी रणनीती