पोस्ट्स

पुर्वांचल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आता तरी आपण जागे होणार का ?

इमेज
         आता तरी आपण जागे होणार का ? असा प्रश्न पडावा ? अश्या घडामोडी सध्या ईशान्य भारतात घडत आहेत जिथे तेथील सामाजिक प्रश्नाबाबत राजकीय प्रश्नाबाबत माहितीचा प्रचंड प्रमाणात अभाव असतो तिथे ती माणसे सध्या  कोणत्या प्रकारे जीवन जगत आहेत याची माहिती असणे तसे अशक्यच.  संघ परिवारातील विविध संघटनामुळे तेथील समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे तेथील समाज देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती बघता त्या प्रयतांची गती प्रचंड प्रमाणत वाढविण्याची गरज असल्याचे सध्या ज्या बातम्या त्या भागातून येत आहे त्यातून प्रतीत होत आहे           सध्या सदर भागातील प्रमुख राज्य असणारे आसाम आणि मेघालय या राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे निसर्गाच्या रौद स्वरूपामुळे तेथील काही जणांना प्राणास देखील मुकावे लागले आहे .रेल्वे सारख्या मूलभूत सोयीसुविधां मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाल्या आहेत . ज्यामुळे मुळातच प्रगतीच्या दृष्टीने अन्य भारताच्या काहीसा मागे असणारा ईशान्य भारत प्रगतीब...

पूर्वांचमधील सुखावणारे बदल

इमेज
  आपल्या मराठी बातम्यांचा विचार करता,  अनेकदा  भारतातीलच असून देखील,  अनेकदा ज्या भागातील बातम्यां फारश्या चर्चेला जात नाहीतर असा भूभाग म्हणजे ईशान्य भारत अर्थांत पूर्वांचल भारताच्या अति पूर्वेकडील ही आठ राज्ये  (सिक्कीम च्या समावेशासह ) अनेकदा दुर्लक्षित रहातात .तेथील समाजजीवन , तेथील राजकीय आर्थिक प्रश्न , त्यांची ऐतिहासिक परिस्थिती याबाबत आपल्यापैकी अनेकांना अत्यंत तुरळक माहिती असते देशाच्या सरंक्षणचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या भूभागात गेल्या आठवड्यात दोन मोठ्या गोष्टी घडल्या . समर्थ रामदास स्वामी यांच्या "जेजे आपणाशी थवा ते ते सकळांसी सांगावे सकल जण या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रानो , सुमारे आठवड्यापूर्वी आसाम आणि मेघालय यांच्या सीमावादाबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले . सन १९७२ च्या आसाम रिओर्गयझेशन ऍक्ट नुसार अस्तित्वात आलेल्या मेघालय या राज्याच्या स्थापनेपासून आसाम राज्याबरोबर सीमा विवाद होता . ज्याचे ७० % निराकारण झाल्याचा दा...

पूर्वांचल वेगाने रेल्वे विकासाच्या वाटेवर !

इमेज
        आपल्या भारताचा विचार करता ईशान्य भारत हा दळणवळणाच्या बाबतीतआतापर्यंत बराच मागे होता मात्र आता विविध प्रकल्पांद्वारे हे मागासलेपण दूर करण्याचा प्रयन्त केला जात आहे ज्यादारे  ईशान्य भारतातील  प्रत्येक राज्याच्या राजधानीपर्यंत रेल्वेसेवा पोहोचवणे तसेच या आधी असलेल्या आणि डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे वेगाने विद्युतीकरण करणे  ही कामे करणे होत आहे या  विकास कामांच्या यादीत नुकतेच दोन कामे झाल्याचे बातम्यातून स्पष्ट झाले समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव ते ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन         तर मित्रानो मणिपूर या राज्याची राजधानी असलेले इंफाळ शहर  रेल्वेचा नकाश्यावर आणण्यासाठी वेगात कामे सुरु आहेत रेल्वेचा एका अंदाजनुसार डिसेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन सन २०२४पासून या मार्गावर रेल्वे धावायला लागेल आजमितीस हा मजकूर लिहीत असताना इंफाळ या शहरापासून १११ किमी दूर असणाऱ्या जिरीबाम पर्यंत रेल्वे धावत आहे आणि सध्या जिरीबाम ते इंफाळ या मार्ग...

अशांत ,अस्वस्थ इशान्य भारत

इमेज
 आपल्या भारताचा एका टोकाला , दुर्लक्षीत असणाऱ्या इशान्य भारत सध्या प्रचंड खदखदतोय. नव्या राज्याचा मागण्या, लष्कराच्या कारवाया, राज्यांचे आपसातील सीमावाद  यामुळे इशान्य भारत सध्या एका तापलेल्या तव्याप्रमाने झाला आहे. ज्यावर इतर विनाकारण ताणलेले अस्मितेचे केलेले प्रश्न बाजूला ठेवून विचार करण्याची नितांत गरज आहे.           त्रिपूरा राज्यातील त्रिपरा या जनजातीने त्याच्यासाठी स्वतंत्र त्रिपरालँड या राज्याची मागणी केली आहे.त्याच्यासाठी त्यांनी राज्यात आंदोलने केल्यावर नवी दिल्लीत देखील आंदोलने केली आहेत. सध्या त्रिपूरा राज्यात भाजपाचे सरकार आहे.प्रस्तावित नव्या राज्याला काँग्रेस, आप आदी सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेशबरोबर 820 किमीची सीमा शेअर करणारा इशान्य वगळता अन्य सातही दिशांना बांगलादेश हा देश असलेला, स्वतःच्या भौगौलिक स्थानामुळे भारताला बांगलादेशामध्ये अंतर्गत भागात काय चालू आहे? याची माहिती घेण्यास साह्य करणारे राज्य म्हणजे त्रिपूरा. म्यानमारबरोबर सिमा असणाऱ्या मिझोराम या छोट्या राज्याबरोबर सीमा असणारे, राज्य म्हणजे त्रिपूरा 19 जनज...

अशांत पूर्वांचल

इमेज
आपल्या महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला असताना भारताच्या एका टोकाला असणाऱ्या दोन राज्यात अर्थात आसाम आणि मिझोराम  राज्यात  सीमेवरून वाद उफाळला आहे . सन 1972  साली आसाम राज्याचे  राज्याचे पुनर्गठन झाल्यापासून तीव्रता या प्रश्नातील दाहकता वाढली होती ,जिने गेल्या काही वर्षापसूम  गंभीर स्वरूप धारण केले आहे . मी या आधी याच ब्लॉग  मधून  समस्येविषयी लिहले होते . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे .  सध्या या समस्येने अत्यंत हिंसक स्वरूप दाखल केले आहे  आसाम राज्यात . 10 जुलैपासून सुरु असलेल्या या ताज्या संघर्षात  सर्वप्रथम  10  जुलै रोजी आसाम मिझोराम यांच्या सीमावर्ती  भागात मात्र आसाम राज्यात  एक छोटासा बॉम्ब ब्लास्ट झाला दुसऱ्याच दिवशी अर्थात11   जुलै रोजी सीमावर्ती भागाच्या मिझोराम  राज्यात बॉम्बब्लास्ट झाला याबाबत दोन्ही राज्यांनी विरोधी राज्याला जवाबदार धरले 24 जुलैच्या मध्यरात्री आसाम राज्य पोलिसांनी मिझोरामच्या प्रदेशात घुसून तेथील नागरिकांवर अत्या...

देशातील अंतर्गत धूसमुस

इमेज
                     आज सध्या आपल्या भारतात कृषी कायद्याविरोधात राळ उठवले असताना, भारतातील मिझोराम आणि त्रिपूरा, तसेच पंजाब आणि हरीयाणा या दोन एकमेकांबरोबर सीमा आणि राजधानी शेअर करणाऱ्या राज्यांत वादाची ठिणगी पडलेल्या आहेत . तसे आपल्या भारताला दोन शेजारच्या राज्यात वाद निर्माण होणे नवे नाही , दोन्ही राज्यातून वाहणाऱ्या नद्या , अथवा सीमाच्या बाबत निश्चित मानांकन न झाल्याने आपल्या भारतात दोन शेजारच्या राज्यात आपल्या भारतात कायमस्वरूपी वाद चालूच असतात . मात्र सध्याचा अशांत अस्थिर  वातावरणात असे वाद उफाळून येणे अधिक धोक्याचे आहे . त्यातही असा वाद जर त्रिपुरा आणि मिझोराम अश्यासारख्या देशाच्या संरक्षणासाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या  महत्वत्त्वाच्या राज्यातील असेल तर परिस्थिती अजूनच बिकट होते , त्याचप्रमाणे पाकिस्तानसारख्या राष्ट्राला लागून असणाऱ्या पंजाब आणि भारताच्या प्रमुख औद्योगिक राज्यात समावेश असणाऱ्या पंजाब आणि हरियाणा या राज्यातील वाद असेल तर मग विचारायलाच नको , अश्या प्रकारचे राज्यांतर्गत असणारे वाद स...

अशांत पुर्वांचल

इमेज
आपली मराठी माध्यमे  काहीश्या अनावश्यक वाटणाऱ्या मुद्द्यांभोवती चर्चाचर्वण करत असताना, आपल्या भारताच्या अतिपुर्वेकडील राज्य असणाऱ्या दोन राज्यांमध्ये सीमा निश्चिती प्रकरणी मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वादंगामुळे एका राज्यात अशंतः जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत झाला आहे.सीमावाद उफळून आलेली  ती राज्ये आहेत आसाम आणि मिझोराम . आणि यामध्ये अशंतः भरडले जाणारे राज्य आहे ,मिझोराम .                                    या वादाला कारणीभूत आहे, भारतावर ब्रिटीशांचे शासन असताना केलेल्या दोन तरतूदी . सन 1875मध्ये केलेल्या तरतूदीनूसार आसाम राज्याला अधिकची जमिन मिळते, तर याच भागासाठी केलेल्या 1933च्या तरतूदीनूसार मिझोराम या राज्याला जास्तीच्या भूमीचा लाभ होतो. कोणती तरतूद प्रमाण मानायची यावरुन दोन्ही राज्यामध्ये 1987 पासून म्हणजेच मिझोराम या राज्याला पुर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून तीव्र  मतभेद आहेत. दोन्ही राज्यांचा या बाबत भावना तीव्र असल्याने याबाबत सातत्याने वाद निर्माण होत असतो. यावर तोडगा...

देशविरहित लोक ..........

इमेज
                   आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय नेते कोणत्या पक्षात जाणार ? याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये हिरहिरीने दिल्या जात असताना,  देशाच्या एका टोकाला असणाऱ्या आसाम या राज्यात वेगळेच नाट्य रंगत आहे. प्रामुख्याने  बांगलादेशी घुसखोरांवर अंकुष ठेवण्यात येऊन गैरमार्गाने भारतात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या देशात पाठवणे सोईचे व्हावे , या हेतूने  मूळ नागरिकांची ओळख  होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या " नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप " या यादीत  सुमारे १९ लाख व्यक्तींची नावे  नसल्याने वेगळाच गोंधळ बघावयास मिळत आहे .                          ही यादी सुधारित आहे . सुमारे सहा वर्षे सरकारी यंत्रणांनी खपून ही यादी तयार केली आहे . या पूर्वी तयार केलेल्या यादीमध्ये सुमारे ४० लाख लोकांची नवे यादीतून वगळण्यात आली होती . त्यावर प्रचंड वादंग उठल्यावर हि ...

हम आपके साथ हे

इमेज
              सध्या आपला मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडत असताना भारताचा इशान्य भागात ब्रम्हपुत्रा नदीने अक्षरशः हाहाकार उडवला आहे . इशान्य भारतातील सर्वात मोठे आणि महत्तवाचे राज्य असणाऱ्या आसाममधील 33पैकी 30 जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे .एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काझीरंगा अभारण्याचा 98% भाग पाण्याखाली गेला आहे . ज्यांना भारताच्या प्राकृतीक रचनेची जाण आहे , त्यांना हे पण लक्षात आले असेल की मेघालय, मिझोराम, मणीपूर नागालँड, अरुणाचल प्रदेश,त्रिपूरा या सर्व राज्यात आपणास बांगलादेशातून न जाता भारतीय हद्दीतून जायचे असल्यास आसामशिवाय तरणोपाय नाही .अरुणाचल या राज्याची तर बातच निराळी .मी या आधी सांगितलेल्या राज्यापैकी अरूणाचल  प्रदेश या राज्यात बांगला देशातून सहजतेने जाता येत नाही जर जायचे असल्यास बांगलादेशातून मणीपूर राज्यात तेथून नागालँड राज्यात तिथून मिझोराम राज्यात पहिल्यांदा जावे लागेल .तिथून मग अरुणाचल प्रदेशात जाता येईल. तर असे हे आसाम राज्य सध्या प्रचंड अस्या पूराच्या विळख्यात सापडले आहे .           ...