पोस्ट्स

डिसेंबर ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऋषभ पंत यांच्या अपघातामुळे निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न

इमेज
    भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू   ऋषभ पंत यांच्या कारला राष्ट्रीय महामार्ग ५८वर शुक्रवरी  पहाटे गंभीर अपघात झाला . स्वतः गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला या अपघाताच्या निमित्याने या आधी अनेकदा चर्चिले गेलेल्या मात्र तरीही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला . तो म्हणजे आपले रस्ते वेगवान वाहने चालवण्यासाठी सक्षम असले तरी चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अश्या प्रकारे वेगवान वाहन चालवण्यास सक्षम आहे का ?           आपल्याकडे रस्ते मोकळे दिसले की  अनेक भल्या भल्या लोकांना एक्सलेटरवर पाय देण्याचा मोह आवरत नाही . रस्ता मोकळा दिसला की , तो आपणास गाडीची वेगमर्यादा ओलांडयाचा परवानाच दिलेला आहे या प्रकारचे वर्तन चालकांकडून अनेकदा घडते . अपघाताच्या वेळी अशी वेगवान गाडी नियंत्रणात आणणे अशक्यप्राय होते आणि अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणत वाढते .  आपणास महामार्गावर प्रवास करताना वेग आवरा स्वतःला सावरा या सारख्या ज्या पाट्या दिसतात त्या मनोरंजासाठी नसतात तर आपणास सावध करण्यासाठी असतात . आपले वाहन जोरात तर नाहीना ?असल्यास त्याचा वेग नियंत्रणात आणण्याची ती सूचना अस