पोस्ट्स

जून ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्वालामुखीच्या तोंडावर पाकिस्तान

इमेज
        सध्या पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांतून दिसून येत आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीने इंधनावर देण्यात येणारी सबसिडी कमी करायला सांगितले आहे असे कारण देत पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारने पहिल्यांदा ३० पाकिस्तानी रुपये आणि त्यानंतर आठ दिवसात पुन्हा ३० पाकिस्तानी रुपये असे एकूण ६० पाकिस्तानी रुपयाने पेट्रोलची दरवाढ एका आठवड्यात केली . विद्यमान सरकारच्या गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत विजेचे दर २४ रुपये प्रति युनिट असे वाढवले आहे गव्हाचा तयार पिठाच्या दरात २४० पाकिस्तानी रुपये प्रति गोणी इतकी वाढ केली आहे पाकिस्तानच्या सरकारने अधिकृतरीत्या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या दोन महिन्यात महागाई निर्देशांकात २ टक्यांची वाढ झाली आहे सरकारच्या अधिकृत अहवालात दोन % वाढ सांगण्यात आली आहे म्हणजे पाकिस्तानात महागाई किती वाढली असेल याचा अंदाज येतो आजमितीस पाकिस्तानमधील महागाई निर्देशांक २० पूर्णांक ८ शतांश  आहे .             पाकिस्तानच्या सरकारने देशाच्या गंभीर आर्थिक स्थितीवर विरोधकांनी राजकारण न करता सरकारचे हात बळकट करण्याचे आवाहन केले आहे आजमितीस पाकिस्त