पोस्ट्स

फेब्रुवारी ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 42 वर्षे!

इमेज
   आज 2021 फेब्रुवारी 11 अर्थात .जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या इराणच्या सुप्रसिद्ध क्रांतीला 42 वर्षे पुर्ण होण्याचा दिवस .आजच्याच दिवशी 42वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली. याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय.असो.       आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द  यांची सत्ता उलथवून टाकत , रुढिवादी धार्मिक विचारांचा प्रभाव असणारी राजवट ज्या दिवश्यापासून इराणमध्ये सुरु झाली, तो म्हणजे 1979 फेब्रुवारी 11. ज्याला आज 42 वर्षे पुर्ण होत आहे.त्यावेळच्या सरकारच्या काही धोरणांमुळे समाजात बेरोजगारी , आर्थिक विषमता वाढणे, या दोषांबरोबरच  इराणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा अमेरीका देश घेत आहे. इराणला त्याचा काही फायदा होत नाही  तसेच आपण अमेरीकेचे गुलाम आहोत अशी भावना निर्माण झाली.ज्याचा फायदा तत्कालीन सरकारच्या विरोधात असणाऱ्या कट्टर मानसिकतेच्या लोकांनी घेतला,आणि इराणमध्ये धार्मिक क्रांती ह