पोस्ट्स

जानेवारी ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्ट

इमेज
              सध्या भारताच्या पश्चिमेला असणारऱ्या पाकिस्तान आणि दक्षिणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात एका वाईट गोष्टीवरून तीव्र स्पर्धा सुरु आहे.  ज्या वाईट गोष्टीवरून ही स्पर्धा सुरु आहे ती म्हणजे कोणता देश पहिल्यांदा दिवाळखोर होतो . दोन्ही देशांच्या आर्थिक स्थैर्याबाबत येणाऱ्या बातम्या दिवसोंदिवस अधिकाधिक वाईट होत चालल्या आहेत दोन्ही देशात महागाईने या आधीचे सर्वांच्या सर्व विक्रम केव्हाच मोडीत काढले आहेत दोन्ही देशात दोन आकडी  महागाई आहे . जेव्हा वस्तूची  किंमत  अत्यंत कमी वेळात   किमान १०% ने वाढते तेव्हा महागाई दोन आकडी झाली असे म्हणतात . आज हा मजकूर लिहीत असताना दोन्ही देशातील महागाई १३ ते १५ % टक्याच्या आसपास आहे ही महागाई रोखणे त्या देशातील केंद्रीय सरकारच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत           आजमितीस जानेवारीच्या पहिल्याआठवड्यात या मध्ये श्रीलंका हा देश दुर्दैवाने पुढे आहे . अपुऱ्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे खर्च कमी करण्यासाठी श्रीलंकेने त्याच्या देशाच्या काही वकिलाती बंद करायचा निर्णय घेतला आहे नोव्हेंब