पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत नेपाळ सबंध एक अवलोकन

इमेज
   सध्या भारताच्या शेजारील देशांबरोबर भारताच्या विविध करार अथवा मैत्री वाढवण्याचा अथवा काही प्रमाणात तणाव वाढवण्याचा घटना घडताय   त्यापैकी बांगलादेश , भूतान ,म्यानमार . मालदीव , श्रीलंका  या देशांबरोबरच्या घडामोडी मी आपणास या आधीच सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायाच्या असतील त्यांच्यासाठी त्या लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली देत आहे . त्याठिकाणी जाऊन आपण त्या वाचू शकतात . या वेळेस मी बोलणार आहे . नेपाळविषयी              नेपाळ आपल्या भारताच्या  शेजारील निसर्गाची उधळण असणारा देश आपल्या  भारताच्या उत्तराखंड, उत्तरप्रदेश बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना सीमा लागून असणारा देश . आपल्या  बौलिवूड मधील एके काळची आघाडीची नायिका कोईराला हीच देश म्हणजे नेपाळ . हिंदू धर्मियांची भारतानंतर सर्वाधिक वस्ती असणारा देश म्हणजे नेपाळ . भगवान शंकराचे जागृत देवस्थान असणारे पशुपतिनाथाचे मंदिर ज्या देशाच्या राजधानीत आहे तो देश म्हणजे नेपाळ . भूतान सारखेच ज्या देशातील लोक भारतीय प्रशासन सेवेत येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ. ज्या देशातील लोकांचे भारतीय लोकांशी रोटी बेटीचे व्यवहार आहेत अशा देश म्हणजे न

रम्य हे भारत श्रीलंका मैत्रीचे बंध

इमेज
            मित्रांनो, सध्या भारताच्या सभोवतालचे देश आणि भारत यांच्यात अनेक घडामोडी घडत आहे. त्यापैकी, बांगलादेश, भुतान, मालदिव, म्यानमार या देशांविषयी मी या आधीच लिहले आहेत. ज्यांना या विषयी माहिती हवी असेल त्यांना सोईस्कर व्हावे या हेतूने त्या आधीच्या लेखांची लिंक या लेखाच्या खाली देण्यात आली आहे.  मी यावेळेस बोलणार आहे, ते श्रीलंकेविषयी          श्रीलंका, भारताच्या  दक्षिणेला असणारे हिंदी महासागरातील बेट स्वरुप असणारे राष्ट्र. भारताच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा सम्राट असणाऱ्या अशोक यांंनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपली मुलगी संघमित्रा हीस ज्या देशात धर्मप्रसारासाठी पाठवले तो देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशाच्या कँंडी या देशात भगवान बौद्धांचा दात सुरक्षीत ठेवला आहे, तो देश म्हणजे श्रीलंका. इंडो आर्यन गटातील सिंहली ही भाषा, ज्या देशातील प्रमुख भाषा आहे, तो देश म्हणजे श्रीलंका . भारताबरोबर बिमस्टेक, काँमनवेल्थ आणि सार्क या संघटनेतील सदस्य देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशामध्ये भारतीय वंशाचे तामिळ भाषिक लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत, तो देश म्हणजे श्रीलंका. एकेकाळी हिंदी गाणी ऐ