पोस्ट्स

मार्च ४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

इमेज
   साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते. आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी जागतिक स्तरावर