पोस्ट्स

डिसेंबर १०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घुसळणी इतिहासाची

इमेज
                             लोकसभेमध्ये 9 डिसेंबर 2019 रोजी एका महत्त्वाच्या विधेयकावरील चर्चेत महत्त्वाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याने भारताच्या फाळणी संदर्भात काँग्रेस या राजकीय पक्षाला जबाबदार धरले आणि यावरून विविध चर्चेला उधाण फुटले . या चर्चेतील काही गोष्टी या वास्तव्याला धरून नव्हत्या . मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यास करत असताना याच्या अभ्यास केला होता . त्या अभ्यासानुसार भारताच्या फाळणीसाठी  काँग्रेसच्या  दुरान्वयेही संबंध नव्हता .तर अन्य पक्ष जवाबदार होता . चोर सोडून संन्याशाला फाशी अशाच प्रकार यावेळी घडला   त्यामुळे या मागची  पार्श्वभुमी जनतेसमोर येण्यासाठी आजचे लेखन .                                              भारताच्या फाळणीची कथा मार्च 1940 च्या लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनापासून सुरु होते . माझ्या मते भारताच्या फाळणीसाठी कोणाला जबाबदार धरायचे असल्यास मुस्लिम लीगलाच जवाबदार धरावे लागेल . त्यांनी केलेल्या राजकारणामुळेच भारताची फाळणी झाली . हा विरोध कसा झाला हे आपल्याला समजून घ्यायचे  असल्यास आपणास कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना ),